दहावी भूगोल प्रश्नसंच
पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा
(१) ब्राझीलमधील कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो ?
उत्तर : ब्राझीलमधील अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात जास्त
पाऊस पडतो.
(२) बंगालच्या उपसागरात केल्या जाणाऱ्या
मासेमारीतून भारतात कोणते जलचर पकडले
जातात?
उत्तर : बंगालच्या उपसागरात केल्या जाणाऱ्या
मासेमारीतून शेवंडे, लबी चकई (क्लूपिड्स), रावस इत्यादी जलचर पकडले जातात.
(३) ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात ?
उत्तर : ब्राझीलकडे ईशान्य व आग्नेय दिशेने वारे
येतात.
(४) ब्राझीलमधील वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण होतो
?
उत्तर : ब्राझीलमधील वाऱ्यांना अजस कड्याचा व ब्राझीलच्या उच्चभूमीचा अडथळा निर्माण होतो.
