Home

  • Home
  • दहावी
  • नववी
  • आठवी
  • शिष्यवृत्ती
  • पुस्तके
  • व्याकरण
  • शासन निर्णय
  • दहावी भूगोल
  • शै.व्हिडिओ निर्मिती
  • pdf Download
  • Online Test
  • सामान्यज्ञान
  • मराठी बोधकथा
  • सण समारंभ
  • शालेय भाषण
  • गेम स्वरुपात उपक्रम
  • Adarsh Education

     Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

    الثلاثاء، 13 يوليو 2021

    पोशिंदा

     

           * पोशिंदा *


    दगड-धोंड्याच्या माळरानात  

    कुळवाच्या चार मारून  रेघोट्या

    वाट पाहिली मिरगाच्या सरीची

    पण तिनं मारल्या कोलांटया  


          वाळक्या मातीत बी पेरून  

          सपान उद्याच्या भाकरीचं पाह्यलं

                मध्येच मारली दडी पावसानं

                पीक शेतात करपून राह्यलं


    त्याच हे सोनेरी सपान

    कष्ट करूनही भंगलं मातीत

    त्याच्या घामाच्या धाराचा

    लिलाव मांडला निष्ठूर जातीत 


    भुकेलेल्या पोरा पाहून

    काळीज मायेन दाटल

    अंधारून आल सार

    थेंब डोळ्यात आटलं


    वाळवून करवंटी त्यान

    भार साऱ्यांचा सोसला

    कर्जापायी त्याचा जीव

    सावकाराच्या फासात फसला


    उभ्या जगाचा पोशिंदा

    साऱ्या दुनयेवर रुसला

    साऱ्या दुनयेवर रुसला

    ليست هناك تعليقات:

    إرسال تعليق

    Write a comment.कमेंट करा

    ad