रक्तदान दिन 1 ऑक्टोबर
विज्ञानाचे आकाशाला गवसणी घालण्याएवढी प्रगती केली आहे. तरीसुद्धा आजपर्यंत मानवी रक्ताला पर्याय सापडलेला नाही ही वस्तुस्थिती आहे. अपघात घडल्यानंतर शरीरातले बरेचसे रक्त वाहून जाते. गंभीर शस्त्रक्रियांवेळीही रक्तस्त्रावाने रुग्ण मृत्युमुखी पडतो, गरोदर स्त्रियांना प्रसूतीवेळीही रक्ताची गरज भासते. थॅलेसेमिया तर रक्ताची निर्मितीच थांबते अशा वेळी चार आठवड्यापर्यंत रक्त मिळाले नाही तर रोगी दगावतो. शिवाय अॅनिमिया (पंडुरोग), कावीळ इ. गंभीर प्रकारच्या आजारांसाठीही बाह्य रक्त देण्याची गरज पडते. म्हणूनच रक्त म्हणजे संजीवनी आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.
सर्वसाधारणपणे मानवाच्या शरीरात ५ ते ६ लिटर रक्त असते, रक्तदानावेळी ३५० मि.ली. एवढे एकावेळी घेतले जाते. छत्तीस तासात नैसर्गिकरित्या पुन्हा शरीर रक्त भरून काढते. रक्तदानानंतर मनुष्य कामावर जाऊ शकतो.
पुन्हा दर तीन महिन्यांनी तो रक्तदान करू शकतो. सामान्यपणे ज्याला गंभीर आजार नाही किंवा काही विशिष्ट आजाराचा
इतिहास नाही अशी कुणीही प्रौढ व्यक्ती रक्त देऊ शकते. १८ ते ६९ वर्षे वयोगटातील व किमान ४५ किलो वजनाची व्यक्ती रक्तदान करण्यास पात्र ठरते. त्यापूर्वी त्या व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास जाणून शारीरिक तपासणी केली जाते. रक्ताच्या या पराधन (ब्लड डोनेशन) क्रियेत निकोप व्यक्तींचे रक्त गरजू व्यक्तीच्या रक्तप्रवाहात सोडले जाते. तरीही कोणाचेही रक्त कोणाला चालते असे नाही त्यासाठी रक्तगट जुळावे लागतात.
'कार्ल लैंडस्टायनर' या जीवरसायन शास्त्रज्ञाने अनेक व्यक्तींच्या रक्ताचा अभ्यास करून असे दाखवून दिले की विविध व्यक्तींचे रक्त, जीवनद्रव्यात आणि लोहित कणांवर असणाऱ्या काही पदार्थामुळे वेगळे असते. पुढे झालेल्या अभ्यासाने चार प्रमुख रक्तगट मान्य झाले ते म्हणजे ए, बी, एबी आणि ओ. म्हणून रक्तदानाच्या क्रियेवेळी दाता आणि ग्राहक यांच्या रक्तगटाची तपासणी अत्यंत गरजेची ठरली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजात आपल्याला व्यावसायिक रहदाते पुष्कळ आढळतात, त्यांचे रक्त स्वीकारताना ते एच. आय. व्ही. विरहित असल्याची खात्री करून घ्यावी नाही तर तसे रक्त स्वीकारणाऱ्याला एड्सची लागण होऊ शकते.
रक्ताला पर्याय नाही. ते निर्माण करता येत नाही. पैसा त्याची जागा घेऊ शकत नाही. रक्ताचा स्रोत केवळ बारवच आहे, रक्तदान निरुपद्रवी आहे. रक्त हे नाशवंत आहे. दानातून प्राप्त झालेल्या साठ्याची रक्तपेढ्यांमध्ये काळजी घ्यावी लागते. आपल्यामुळे एखाद्याला जीवनदान मिळते ही कल्पनाच आनंददायी आहे. रक्तदान हे सामाजिक काण आहे म्हणूनच असंख्य रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदानास तयार व्हावे व पुण्यकर्म साधावे. जनतेस रक्तदानाची महाली पटाची म्हणून रक्तदान दिन साजरा केला जातो. युवक, कामगार, वसाहती, शासकीय कार्यालये, महिलामंडळे, सामाजिक संस्था, महाविद्यालये यांच्या सहकार्याने स्वैच्छिक रक्तदान मोहीम यशस्वी करून राज्यास रक्तसंकलनाबाबत स्वयपूर्ण करण्याचा शासनाचा मानस आहे. आपणही आपल्या वाढदिवशी किंवा राष्ट्रीय सणादिवशी वर्षातून एकदा श्री रक्तदान करूया व म्हणूया
करूनी दान रक्ताचे
जोडुया नाते बंधुत्वाचे !