Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Tuesday 22 June 2021

अलंकार मराठी व्याकरण

 

अलंकार

        अलंकार या शब्दाचा अर्थ दागिनाअसा आहे. दागिने घातल्यामुळे माणसाच्या शरीराला शोभा येते.त्याच्या सौंदर्यात भर पडते.त्याचे रूप अधिक सुंदर,देखणे,प्रभावी बनत असते. जी गोष्ट व्यक्तीची तीच भाषेची.भाषा अधिक परिणामकारक बनावी किंवा चांगली दिसावी म्हणून भाषेत अलंकारीक शब्दाचा वापर करतो.

 उदा. तुझे चालणे मोहक आहे.असे न म्हणता चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचलेअशी रचना कवीने केल्यामुळे तीच कल्पना उठावदार दिसून कानाला गोड वाटते. म्हणून ज्या चमत्कृतीपूर्ण रचनेमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते.त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात.

अलंकाराचे प्रकार

अलंकार

शब्दालंकार                  अर्थालंकार


शब्दालंकार

जे अलंकार शब्दांवर,त्यातील अक्षरे वा स्वरासहित व्यंजन    समूहावर 

आधारलेले असतात त्यांना शब्दालंकार म्हणतात.

                                                                                                        शब्दालांकाराचे उपप्रकार 

                                                                 

                                               अनुप्रास                                                                 यमक                                                   श्लेष

अनुप्रास अलंकार  : जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा पद्यचरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे सौंदर्य निर्मिती होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.

            उदा. १)  काकांच्या कामाची कागदपत्रे काकींनी कात्रीने कराकरा कापली.

         २)  पतिव्रतेच्या पुण्याईने पापी पुरुष

          परमेश्वरपदास पोहोचतो.

यमक अलंकार : जेव्हा पद्य चरणाच्या शेवटी,मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने येतात तेव्हा यमकअलंकार होतो.

            उदा. १) सुसंगति सदा घडो,सुजनवाक्य कानी पडो |

               कलंक मतिचा झडो,विषय सर्वथा नावडो ||

                    २)अशी पाखरे येती आणिक स्मृति ठेवुनी जाती

                 दोन दिवसाची रंगत संगत दोन दिवसांची नाती

श्लेष अलंकार  : श्लेष याचा अर्थ मिळणे ,जुळणे ,भेटणे,मिठी मारणे असा आहे.

               जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा काव्यात एका शब्दाला एकाहून अधिक अर्थ जडलेले असतात तेव्हा श्लेष अलंकार होतो.           एकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्याने शब्द चमत्कृती साधने , तेव्हा श्लेष अलंकार होतो.  

 उदा. १) मित्राच्या उदयाने मनाला आनंद होतो .

     १) मित्र सूर्य        २) मित्र  - स्नेही   ३)मित्र  - दोस्त  -सखा 

   २) श्रीकृष्ण नवरा मी नवरी  | शिशुपाल नवरा मी न वरी

        नवरा नवरी  , नवरा वरी

अर्थालंकार  : जे अलंकार शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थावर आधारित असतात अर्थालंकार म्हणतात .


अर्थालंकार प्रकार

 १ ) उपमा अलंकार  : जेव्हा दोन वस्तूंमधील साम्य किंवा सारखेपणा दाखविलेला असतो तेव्हा उपमा अलंकारहोतो.

 उदा. १) आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे|

       २) सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी|

३) मुंबईची घरेमात्र लहान |कबुतराच्या खुराड्यांसारखी | 

  १.ज्याची तुलना करावयाची त्याला उपमेय म्हणतात

 २.ज्याच्याशी तुलना करावयाची त्याला उपमान म्हणतात  ३. दोन वस्तूंमधील सारखेपणाला साधारणधर्म  म्हणतात   ४. सारखेपणा  दाखविनाऱ्या शब्दाला साम्यवाचक शब्द                                                    म्हणतात     

२)उत्प्रेक्षा अलंकार : उपमेयहे जणू उपमानच आहे अशी कल्पना केलेली असते तेव्हा उत्प्रेक्षाअलंकार होतो.

(या अलंकारात जणू,जणू काय,गमे,भासे,वाटे की असे साधर्म्यवाचक शब्द असतात.)

उदा.१) ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू

        २)खळखळ वाहत लगबग येती तटिनी गिरीवती  |

          देवदर्शना जणू चालल्या भाविक या तरुणी ||

३ )रूपक अलंकार : उपमेय व उपमान यांत एकरूपता आहे,ती भिन्न नाहीत .असे वर्णन जिथे असते,तिथे रूपक हा अलंकार असतो. ( उपमेय हे उपमानच आहे असे वर्णन असते.)

  उदा. १) लहान मूळ म्हणजे मातीचा गोळा /

                आकार द्यावा तशी मूर्ती घडते.

      २) बाई काय सांगो | स्वामीची ती दृष्टी |

           अमृताची वृष्टी  | मज होय |  

४ ) व्यतिरेक अलंकार : उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन केले  असेल तर व्यतिरेक अलंकार होतो.

उदा.   १) अमृताहुनी गोड नाम तुझे देवा.

            २) कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हिचे बलवान.

            ३) सावळा ग रामचंद्र | रत्नमंचकी झोपतो | त्याला पाहता लाजून | चंद्र आभाळी लोपतो ||

५ )स्वभावोक्ती अलंकार : एखाद्या वस्तूचे, व्यक्तीचे,प्राण्याचे,स्थळाचे वा अविर्भावांचे हुबेहूब वर्णन कवी करतो तेव्हा स्वभावोक्ती अलंकार होतो.

  उदा. १) मातीत ते पसरले अतितम्य पंख

                  केले वरी उदर पांडुर निष्कलंक

                  चंचू तशीच उघडी पद लांबविले

                  निष्प्राण देह पडला श्रमही निमाले

            २) किती माझा कोंबडा ऐटदार

               चाल त्याची किती बरे डौलदार

              शिरोभागी सर्वथा तुरा हाले   

              जणू जास्वंदी फूल उमलले.

 ६ ) अतिशयोक्ती अलंकार :वाक्यातील मूळ कल्पना आहे त्यापेक्षा फारच फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो.

उदा.   १) वीर मराठे गर्जत आले, पर्वत सारे कंपित                     झाले.

   २) दमडिचं तेल आणलं,सासूबाईच न्हाण झाल,

     मामंजीची दाढी झाली,भावोजींची शेंडी झाली,

     उरलं तेल झाकून ठेवलं,लांडोरीचा पाय लागला,

     वेशीपर्यंत ओघळ गेला,त्यात उंट पोहून गेला

७) चेतनगुणोक्ती अलंकार : निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जेथे वर्णन असते तेथे चेतनगुणोक्ती अलंकार होतो.

उदा.१) डोकी अलगद घरे उचलती | काळोखाच्या उशीवरूनी||

२) मंगल मंगल गीत म्हणे , अस्फुट रजनी मूकपणे ||

८ ) अनन्वय अलंकार : उपमेय हे उप्मानासार्खेच असते. त्याला दुसर्या क्ष्शीच उपमा देता येत नाही. असे वर्णन आले की अनन्वय अलंकार होतो.

उदा.   १) आहे ताजमहाल एक जगती तो तोच  त्याच्यापरी

            २) या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान.

 ९ ) दृष्टांत अलंकार : दृष्टांत म्हणजे दाखला.एखाद्या गोष्टीच्या स्पष्टीकरणासाठी दुसऱ्या गोष्टीचा दाखला दिला जातो तेव्हा दृष्टांत अलंकार होतो.

उदा.   १)लहानपण दे गा देवा | मुंगी साखरेचा रवा |                 ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार | 

२)न कळता पद अग्निवरी पडे | न करि दाह असे न कधी घडे अजित नाम वदो भलत्या मिसे |सकल पातक भस्म करीतसे ||

१० ) अपन्हुती अलंकार  : एखादी वस्तू पाहूनही टी वस्तू नसून दुसरीच आहे म्हणजे उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असे वर्णन आले असता अपन्हुती अलंकार होतो.

उदा.   १) न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील.

            २) पाठीवरी वेणी नच, नागीणच काळी

११ ) अर्थांतरण्यास अलंकार  : जेव्हा एखाद्या सामान्य गोष्टीच्या समर्थनार्थ एखादी विशिष्ट गोष्ट सांगितलेली असते किंवा एखाद्या विशेष गोष्टीच्या समर्थनार्थ एखादा सामान्य सिद्धांत सांगितलेला असतो तेव्हा अर्थांतरण्यास अलंकार होतो.

उदा.१) आली जरी कष्टदशा अपार , न टाकिती धैर्य तथापि थोर

    केला जरी पोत बळेचि खाले , ज्वाला तरी ते वरती उफाळे

२) वृक्ष फार लवती फलभारे , लोंबती जलद घेऊनि नीरे

     थोर गर्व न धरि विभवाचा , हा स्वभाव उपकार पराचा

१२ )अन्योक्ती अलंकार  : जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये अगर पद्यात दुसऱ्याला स्पष्टपणे न बोलता उद्देशून बोललेले असते तेव्हा अन्योक्ती अलंकार होतो.

उदा.   १) सरड्याची धाव कुंपनापर्यंत.

            २) सांबाच्या पिंडीत बससी 

अलंकार  सराव  प्रश्न  शिष्यवृत्ती परीक्षा      

Saturday 19 June 2021

काळ(Tense)

 

काळ(Tense):

        प्रत्येक वाक्यातील क्रियापादावरून आपल्याला क्रियेचा बोध होतो. त्याच प्रमाणे ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे, घडली आहे अथवा पुढे घडणार आहे याचाही बोध होतो. त्या बोध होण्यासच त्या वाक्यातील काळ असे म्हणतात.

कर्त्याने केलेल्या कार्याची वेळ दाखवणाऱ्या शब्दास क्रियेचा काळअसे म्हणतात .

काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत.

१) वर्तमान काळ (Present Tense): क्रिया आता घडते. उदा:- मी काम करतो.

२) भूतकाळ (Past Tense): क्रिया पूर्वी घडली. उदा:- मी काम केले.

३) भविष्यकाळ ( Future Tense): क्रिया पुढील काळात घडली. उदा:मी काम करीन.

क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे जेव्हा समजते,तेव्हा तो वर्तमानकाळ असतो. उदा.मी लेखन करतो. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली  असे जेव्हा कळते ,तेव्हा तो भूतकाळकाळ असतो. उदा.मी लेखन केले .

क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे  घडेल  असे जेव्हा कळते ,तेव्हा तो भविष्यकाळ असतो. उदा.मी लेखन करेन . 

काळ    (Tense)

या शिवाय प्रत्येक काळाचे तीन मुख्य उपप्रकार आहेत.

१) वर्तमान काळ(Present Tense):

   (१) साधा वर्तमान काळ(Simple Present Tense)

: उदा. मी निबंध लिहितो.

            (२) अपूर्ण वर्तमान काळ(Presnt Progressive Tense): उदा. मी निबंध लिहित आहे.

     (३)पूर्ण वर्तमान काळ(Present Perfect Tense):

 उदा. मी निबंध लिहिला आहे.

२) भूतकाळ(Past Tense)

(१) साधा भूतकाळ(Simple Past Tense): उदा. मी निबंध लिहीन.

(२) अपूर्ण भूतकाळ(Past Progressive Tense): उदा. मी निबंध लिहीत होतो.

(३)पूर्ण भूतकाळ(Past Perfect Tense): उदा. मी निबंध लिहीला होता.

३) भविष्यकाळ(Future Tense):

   (१) साधा भविष्यकाळ(Simple Future Tense): उदा. मी निबंध लिहीन.

            (२) अपूर्ण भविष्यकाळ(Future Progressive Tense): उदा. मी निबंध लिहीत असेन.

   (३)पूर्ण भविष्यकाळ(Perfect Future Tense): उदा. मी निबंध लिहीला असेल.

Thursday 17 June 2021

वाक्यांचे प्रकार

 वाक्यांचे प्रकार

 मराठी भाषा बोलत असताना अनेक  अक्षर समूह एकत्र येऊन  शब्द बनतो. असे अनेक शब्द समूह एकत्र येऊन एक वाक्य तयार होते. आपल्या  बोलण्यातून अशी अनेक वाक्य एका मागून एक येत असतात. प्रत्येक वाक्य संपूर्ण विधान असते. असे विधान आपण   कोणाबद्दल काहीतरी बोलतो; म्हणजे विधान करतो , बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला उद्देश असे म्हणतात व उद्देशाविषयी तो जे बोलतो त्याला विधी असे म्हणतात. प्रत्येक वाक्यात उद्देश्य व विधेय या गोष्टी असतात.  उदा. मित्राचा मुलगा आज बास्केटबॉलच्या सामन्यात चांगला खेळला .या वाक्यात खेळला हे विधान कोणाला उद्देशून आहे? तर मुलगा याच्याबद्दल उद्देशून केले आहे. म्हणजे या वाक्यात मुलगा हे उद्देश आहे तर खेळला हे विधेय आहे.वरील वाक्यात उद्देश आणि विधेय याशिवाय जे शब्द आलेले असतात ते विधेय याचा विस्तार करतात.म्हणजे कोठे ,केव्हा,कसा या प्रकारे विस्तारित माहिती देतात.

       आपले विचार व्यक्त करताना ; वेगवेगळी वाक्य विस्कळीतपणे  मांडण्याऐवजी ती एकत्र करून  मांडल्याने व्यक्त होणाऱ्या विचारांमध्ये सुसंगतपणा येतो. वाक्यामधील फापट पसारा  न दिसता ते अधिक आटोपशीर  व आकर्षक वाटते.यासाठी वाक्याचे योग्य प्रकारे संकलन करता येणे ही एक कला आहे.

         आपण वाक्याची कोणत्या प्रकारे रचना केली आहे. त्या वाक्यातून कोणता अर्थ अभिप्रेरीत आहे.त्यानुसार वाक्याचे रचनेवरून व अर्थावरून असे निरनिराळे प्रकार पडतात. बोलणाऱ्याच्या अथवा लिहिणाऱ्याच्या वाक्यातील अर्थावरून वाक्याचे खालील प्रकार पडतात.  

अर्थावरून वाक्याचे प्रकार

1.    विधानार्थी वाक्य  2.. प्रश्नार्थक वाक्य  3. आज्ञार्थी वाक्य   4. उद्गारार्थी विधानात  

            5.   होकारार्थी वाक्य  6.     नकारार्थी वाक्य    7.   इच्छार्थक  वाक्य                                                 

          वाक्यातील विधानावरून अथवा रचनेनुसार वाक्याचे खालील प्रकार पडतात.  


वाक्याच्या रचनेवरून वाक्याचे प्रकार  

    1.  केवलवाक्य      2. मिश्रवाक्य     3 . संयुक्तवाक्य                               

                            शब्दांच्या जाती कोणत्या पहा 

1)  1.  विधानार्थी वाक्य  : ज्या वाक्यात केवळ एक विधान केलेले असते .त्या वाक्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात.

 उदा. १. माझे वडील आज गावी गेले.

     २. आज शिवदर्शनास प्रचंड गर्दी होती.

2) प्रश्नार्थक वाक्य :  ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. 

उदा. १. तुम्ही पुण्याहून केंव्हा येणार आहात?

    २. तुझ्या शाळेस सुट्टी कधी आहेत?   

3)  आज्ञार्थी वाक्य : वाक्यातील क्रियापदावरून आज्ञा ,आशीर्वाद ,प्रार्थना , विनंती ,किंवा उपदेश या गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा. १. मुलांनो,नेहमी व्यायाम करा.

     २.परमेश्वरा ,त्यांना सदबुद्धी दे.

४) उद्गारार्थी वाक्य : ज्या वाक्यातून तिरस्कार ,दु:ख,हर्ष,आश्चर्य,आनंद अशा भावनेचा उद्गार काढलेला असतो.त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा. १. शाब्बास ! छान कामगिरी केलीस .

    २. अरेरे ! केवढा मोठा अपघात .

५) होकारार्थी वाक्य : ( करणरुपी ) ज्या वाक्यातील विधानात होकार असतो,त्या वाक्यास होकारार्थी वाक्य म्हणतात.

उदा. १. अपूर्व अभ्यास करतो. 

    २. तो नेहमी खरे बोलतो.

६) नकारार्थी वाक्य : ( अकरणरुपी ) ज्या वाक्यातील विधानात नकार असतो,त्या वाक्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा . १. रमेशचा मुलगा मुळीच  अभ्यास करत नाही.

       २. सुरेशचे अक्षर तसे वाईट नाही.

७) इच्छार्थी वाक्य : ज्या वाक्यातून मनातील इच्छा दर्शविली जाते त्या वाक्यास इच्छार्थी वाक्य असे म्हणतात.

उदा.  १. आज गार वारा सुटावा .

      २. सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी पास होवोत.

वाक्यांचे वाक्यातील विधानानुसार प्रकार

१)    केवलवाक्य  : कोणत्याही वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असेल तर त्या वाक्याला शुद्धवाक्य किंवा केवलवाक्य असे म्हणतात.

केवलवाक्य हे साधे,विधानार्थी,प्रश्नार्थी,आज्ञार्थी, होकारार्थी,अथवा नकारार्थी असे कोणत्याही प्रकारचे असू शकते.

उदा. १. शाम नेहमी सकाळी श्लोक वाचतो.

    २. स्नेहा गाणे गाते.

२) संयुक्त वाक्य : जेव्हा दोन स्वतंत्र वाक्य आणि, व, या  प्रधानत्वबोधक उभवान्वयी अव्ययांनी जोडली असता जे एक जोड वाक्य तयार होते, त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. (संयुक्त वाक्यात दोन्ही वाक्ये स्वतंत्र व प्रधान असतात. ती ‘आणि’, ‘व’ या प्रधानत्वबोधक उभवान्वयी अव्ययाबरोबर पण, किंवा, अथवा अशा उभवान्वयी अव्ययांनी ही जोडलेली असतात.)

उदा. १. मी दररोज सकाळी फिरायला जातो किंवा योगा करतो.

    २. गड आला पण सिंह गेला.

३) मिश्र वाक्य : जेव्हा दोन वाक्य (एक प्रधान व एक गौण )

न्यूनत्वबोधक उभवान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात.

( न्यूनत्वबोधक उभवान्वयी अव्यये – पण,परंतु,कारण,की,म्हणून, सबब,यास्तव,शिवाय,जेव्हा-तेव्हा,जर-तर,जसे-तसे,जरी-तरी,ज्यावेळी-त्यावेळी इत्यादी )

उदा. १. जर विठ्ठलने प्रामाणिक अभ्यास केला असेल तर तो परिक्षेत हमखास पास होईल.

    २. गुरुजी म्हणाले की,पृथ्वी सूर्याभोवती फिरते.

  मराठी समास व्याकरण  

 

Text Box: संजय शामराव मगदूम सर 
आदर्श विद्यालय आंबवडे 
ता.पन्हाळा जिल्हा कोल्हापूर 
मोबा.नं. ८७८८६२९१३३