Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Thursday 27 July 2023

नवोपक्रम स्पर्धा2023

  नवोपक्रम स्पर्धा2023  फॉर्म भरण्याची मुदत अध्यापनामध्ये वेगळे काम करणाऱ्या  शिक्षकांसाठीची स्पर्धा



Wednesday 26 July 2023

बेसिक मराठी इंग्रजी

  बेसिक मराठी इंग्रजी  शब्द 

शिष्यवृत्ती परीक्षा 

https://www.magadumsir.com/2023/05/shbd.html

विषय : मराठी /इंग्रजी

उपक्रमाचा उद्देश : मराठी   शब्दाची ओळख करणे . https://tinyurl.com/3xm3e3ck

                                मराठी  शब्दाचे दृढीकरण करणे ,बेसिक शब्दांची  ओळख करणे.

                                शिष्यवृत्ती परीक्षा तयारीसाठी सराव करणे. https://www.magadumsir.com/2023/05/shbd.html

उपक्रम कोणासाठी ?

मराठी इंग्रजी माध्यमाच्या सर्व विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यासाठी .

उपक्रमाचा खेळ कसा खेळावा ?

१.प्रथम स्क्रिनवर दिलेल्या सूचना वाचा व start बटनावर क्लिक करून खेळास सुरुवात करा.


आजची लिंक https://tinyurl.com/3xm3e3ck  - चक्र फिरवा शब्द ओळखा

स्वर -स्वरादी वर्णमाला

 स्वर -स्वरादी वर्णमाला 

खेळा गेम 


गेम खेळताना स्वर स्वरादी योग्य ठिकाणी  drag and drop करा. 

Sunday 2 July 2023

गुरुपौर्णिमा /व्यासपौर्णिमा

 *गुरु पौर्णिमा



 *गुरु गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥* 

व्यासपीठावरील मान्यवर सुज्ञपरीक्षक समोर बसलेले माझे बालमित्र मी................... आपणासमोर आज विषय मांडत आहे गुरुपौर्णिमा 

गुरुपौर्णिमा निमित्त सर्व गुरुजनांना सादर प्रणाम 

गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे रूप! या साक्षात प्र्ब्रम्ह्याला माझा  नमस्कार असो! असा गुरुमहिमा भारतीय संस्कृतीत वर्णन केला आहे. ही गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमेदिवशी साजरी होते. 

 व्यास महर्षीनी महाभारत हा महान ग्रंथ लिहिला. महाभारत काळातील मोठे विद्वान, श्रेष्ठ असे व्यासमुनी होऊन गेले. त्यांच्याइतके थोर, व्यासंगी ज्ञानसंपत्र गुरु अद्यापपर्यंत झाले नाहीत अशी आपली श्रद्धा  आहे. राजावाचून सेना, शेतकऱ्यावाचून मळा आणि मंगळसूत्राचून गळा, नावाड्याशिवाय नौका या जशा  गोष्टी विसंगत वाटतात त्याप्रमाणे   सद्गुरूशिवाय जीवन व्यर्थ आहे. म्हणूनच श्री समर्थांनी 'सद्गुरुविण जन्म निष्फळ' असे म्हटले आहे.

video link click here 

        साध्या डोळ्यांना अवकाशातील ग्रहगोलांचे निरीक्षण करण्यासाठी जशी दुर्बिणांची आवश्यकता असते  त्याप्रमाणेच  गुरु हे जीवनातील मार्गदर्शक दीपस्तंभ आहेत. चांगले मित्र, चांगले शेजारी याप्रमाणे चांगले शिक्षक वा  गुरु आयुष्यात लाभणे हेही महत्त्वाचे असते ते ते शिक्षक, गुरू आपल्या आचार-विचारांना किंबहुना जीवनाला योग्य  वळण लावत असतात. त्यातूनच समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या विभूती निर्माण होतात.

    कोणताही मनुष्य परिपूर्ण नसतो तो चुकत  माकत शिकत असतो. शिकताना परिस्थिती असो, अनुभवांची शिदोरी असो, निसर्गावलोकन  असो, ग्रंथवाचनाचे वेड असो की जीवन यशस्वी होण्यासाठी झटणारे माता-पिता, बंधू-भगिनी, शिक्षक-देवता असोत, कोणत्यातरी आदर्शरूप तत्वांचा व्यक्तीचा प्रभाव सुयोग्यपणे पडत जातो. त्यामुळे कळत नकळत मनुष्य स्वतःला 'घडवत' जातो. 'बिघडत' मात्र नक्कीच नाही.  प्रत्येकाच्या जीवनाला सुंदर घाट मिळणेच  महत्वाचे असते. म्हणूनच सद्गुरूंना  शरण  जाऊन नम्र  शिष्यत्व पत्करणे केव्हाही चांगलेच.

    आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करून कुटुंबाचा, समाजाचा राष्ट्राचा उद्धार करतो त्या गुरूंची  आठवण  ठेवून सन्मान करणे, कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांना वंदन करून आशीर्वाद घेणे आपले कर्तव्य आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमा हा  दिवस सर्वच क्षेत्रात आपणास ज्ञानदान करणाऱ्या गुरुबद्दलची आपली आदराची भावना व्यक्त करण्यासाठी आहे. प्राचीन काळी श्रीराम-श्रीकृष्ण यांनीही वसिष्ठ, सांदिपनी ऋषींकडे  ज्ञानार्जन केले होते.

    महर्षी व्यास हे जीवनाचे खरे भाष्यकार व समाजाचे खरे गुरू होते. जगातील महान साहित्यिक,तत्ववेत्ता म्हणून  व्यासाची कीर्ती आहे. अठरा पुराणे, महाभारत, ब्रह्मसत्रे , ऋग्वेदादी वेदाचे चार भाग असे प्रचंड वाड्मय  त्यानी लिहिले. 'व्यासोच्छिष्ट जगत् सर्वम्' म्हणजे तुम्ही कोणताही विचार मांडाल तर व्यासांनी त्यावर आधीच विचारमंथन केले म्हणून तो 'उष्टा  विचार' असे पूर्वजांनी म्हटले आहे. आजच्या व्यासपूजेच्या निमित्त संस्कृती घडविणाऱ्यांचे पूजन  होऊन  गुरुपौर्णिमा साजरी होते!


सेतू अभ्यासक्रम व सर्व इयत्ता चाचणी


https://rb.gy/xlil7  


इयत्ता निहाय चाचणी डाऊनलोड करा


https://rb.gy/xlil7  


सेतू अभ्यासक्रम कालावधी किती

https://www.magadumsir.com/2023/06/setuabhyas2023.html