Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Tuesday 8 February 2022

पद्मश्री बाबा आमटे स्मृतिदिन- ९ फेब्रुवारी

 

पद्मश्री बाबा आमटे स्मृतिदिन- ९ फेब्रुवारी


सामाजिक-कौटुंबिक उपेक्षा, अंतहीन वेदना आणि शरीर जखमांनी विदीर्ण झालेल्या कुष्ठ बांधवांना आपलेसे करून व श्रमाचा मंत्र देऊन आत्मनिर्भर केले. त्या आधुनिक 'बाबा', मुरलीधर देवीदास आमटे यांचा जन्म हिंगणघाट, जि.वर्धा येथे २६ डिसेंबर १९१४ साली जहागीरदार ब्राह्मण कुटुंबात झाला. बंगला गाडी, नोकर-चाकर, भरपूर शेतीवाडी बालपणापासून दिमतीला असलेल्या या युवकावर कॉलेज जीवनात प्रभाव पडला तो साने गुरुजी, विनोबा भावे, संत तुकडोजी महाराज यांच्या विचार संस्कारांचा! त्यामुळेच आपली वकिली सोडून वरोरा गावातल्या दीन दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी फकिरी पत्करली.

एके दिवशी त्यांना रस्त्याच्या कडेला कुष्ठरोगाने जर्जर, विव्हळ झालेला तुळशीराम दिसला आणि चाकोरीबद्ध जीवनाकडे पाठ फिरवून बाबांनी कुष्ठरुग्ण सेवेचे असिघाराव्रत घेतले. त्यासाठीचे अत्याधुनिक ज्ञान प्राप्त करताना स्वतः चे शरीर संशोधनासाठी वापरण्यास दिले. १९५१ साली त्यांनी 'महारोगी सेवा समिती' ची स्थापना केली 'आनंदवन' येथे कुष्ठरुग्णांवर औषधोपचार करून, जगण्याची मानसिकता बाढवून, छोट्या मोठ्या उद्योगांनी त्यांना स्वावलंबी बनवले. आनंदवनात कुष्ठरुग्णांच्या मदतीनेच शेते बागा, तळी विहिरी, फुले- पिके, गोपालन-कुकुटपालन, जलसंधारण वृक्षरोपणाचे पहिले प्रयोग केले. बाबांनी कुष्ठरुग्णांसाठी गोकुळ, संधीनिकेतन, स्नेहसावली, उत्तरायणासारखे प्रकल्प उभारलेच परंतु समाजातील अंध-अपंग, मूक-बधिर, वंचितांच्या शिक्षणासाठी शाळा, महाविद्यालये, व्यवसायकेंद्रे स्थापन केली.

बऱ्या झालेल्या कुष्ठरुग्णांसाठी, अंधश्रद्धा गरिबीने पिचलेल्या आदिवासींसाठी शिवाय बहकणाऱ्या तरुणाईसाठी बाबांनी अशोकवन, सोमनाथ, नागेपल्ली व हेमलकसा येथे मानवोद्धाराची प्रकल्पमंदिरे स्थापन केली. 'श्रम हाच आपला श्रीराम आहे' किंवा 'तुमचे भविष्य तुमच्या मनगटात लपले आहे याची शिकवण देत बाबांनी विविध ठिकाणी आरोग्य, अत्याधुनिक शेती, दारिद्र्य, अंधश्रद्धानिर्मूलन, लघुउद्योग, जोडधंदे, ग्रामीण विकास, युवक मार्गदर्शन असे नवनवे प्रयोग राबविले ते पाहण्यासाठी तेथे अनेक परदेशी संस्था व व्यक्ती आल्या. त्यांनी कार्याची प्रशंसा करून भरघोस निधी प्राप्त करून दिला.

बाबांना त्यांच्या पत्नी साधनाताईंची अनमोल साथ लाभली. बाबांची अनेक दुखणी, आजारपणे यांनी ते वारंवार त्रस्त असायचे. तरीही १९८५ साली अशांत भारत देशात शांतीचा संदेश देण्यासाठी बाबांनी 'भारत जोडों अभियान सुरू केले. देशातील हिंसाचार, दंगेधोपे, जातिभेद, प्रांतभेदांनी उसळलेल्या दंगली पाहून त्याचे मन अस्वस्थ व्हायचे. त्यामुळे पेटलेल्या पंजाबास भेटी दिल्या, गुजरात मुंबईतील दंगलग्रस्तांना ते भेटले. नर्मदा आंदोलनात सामील झाले. ज्याला आणि फुले, करुणेचा कलाम हे काव्यसंग्रह तर माती जागवील त्याला मत, उद्याच्या उज्वल यशासाठी. वर्कर्स युनिव्हर्सिटी ही त्याची पुस्तके प्रसिद्ध आहेत.

डमियन डाटन, रामन मॅगसेसे, युनायटेड नेशन्स, राईट लाईव्हहूड, पद्मश्री पद्भूषण असे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय असंख्य पुरस्कार-सन्मान त्यांना लाभले. बाबांची आता दुसरी व तिसरी पिढीही मुले, सुना नातवंडासहीत कार्यरत आहे. अशा या पीडित मानवांच्या उद्धारासाठी झटणाऱ्या महामानवाचे ९ फेब्रुवारी २००८ रोजी महानिर्वाण झाले.

शैक्षणिक व्हिडिओ  -click  here