Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Friday 23 September 2022

जलसुरक्षा उपक्रम /प्रकल्प

 

जलसुरक्षा उपक्रम /प्रकल्प 

उपक्रम 

मानवी हस्तक्षेपामुळे तुमच्या परिसरातील जलस्रोतरावर/जलपरिसंस्थेवर झालेला परिणाम अभ्यासणे .

 


उपक्रमाचाउद्देश / महत्त्व :

अन्न, वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. निसर्गाकडून मिळणारे पाणी नेहमी शुद्ध असते जैविक व अजैविक घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि त्याच्यातील आंतरक्रिया याला परीसंस्था असे म्हटले जाते. यामुळे आपणास वीशिष्ट परीसरांचे स्थान कसे आहे, याठिकानी असलेले क्षेत्र व त्याचा आकार त्या ठीकाणी असणारे हवामान, त्या ठीकाणची भूगर्भरचना खडक - जमीन, जलप्रवाह, प्रणाली या वीषयाची माहिती आपल्याला मिळते.

 

उपक्रम आणि कार्यपध्दती :

मानवी हस्तक्षेपामुळे जल परिसंस्था जलस्त्रोतांची झालेली हानी व त्यातील घटकांवर झालेल्या परिणामांची विशेष नोंदी सह माहिती

जलपरी संस्थेचे गोड्या पाण्यातील परिसंस्था व खाऱ्या पाण्यातील परिसंस्था असे दोन मुख्य प्रकार आहेत. गोड्या पाण्यातील जलपरी संस्थेचे स्थिर जल परिसंस्था आणि प्रवाही जल परिसंस्था असे दोन प्रकार केले जातात. परिसंस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी पाण्याची नितांत गरज असते पाणी नसेल तर पोषकद्रव्य वाहून नेली जाणार नाहीत. जैवविविधता ही पाण्यावरच अवलंबून असल्याने पाणी आणि परिसंस्था ही परस्परावलंबी असून त्यांचा जवळचा संबंध आहे.

उपक्रम आणिकार्यपध्दती

1) लोकसंख्या वाढ हा जल परिसंस्था व जल स्तोत्रांची हानी होण्याची एक कारण आहे यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे त्याचप्रमाणे मानवाने आपल्या चौक सोयींसाठी नदी तलाव समुद्र या ठिकाणी अतिक्रमण करून त्या ठिकाणी रस्ते घरे इत्यादी बांधकाम केल्यामुळे जलपरी संस्था नष्ट होऊ लागल्या आहेत.

 

2) मानवी हस्तक्षेप स्थापत्य अभियंते म्हणजेच इंजिनियर यांनी रेल्वे मार्ग, रस्ते, पूल, शहर विकास -सांडपाणी व्यवस्था, जलसिंचन, पाणीपुरवठा योजना, नागरी जीवन समृद्ध करण्यासाठी निर्माण करत असतात. असे लक्षात येते की अभियंते या व्यवस्थेकडे केवळ निर्जीव बांधकाम म्हणून करतात.

3) औद्योगीकरण :- विज्ञानाच्या साह्याने मानव अधिक प्रगती करत आहे यामध्ये औद्योगिकीकरण यांचा झपाट्याने वाढ व विस्तार होत आहे कारखान्यात वापरले जाणारे पाणी हे नदीपात्रामध्ये सोडले जातील व त्यामुळे या ठिकाणी असणारी जल्परी संस्था नष्ट होण्याच्य मार्गावर आहेत.

 

4) कीटकनाशके :- सध्या बरेच शेतकरी पिकांवरील किडी चा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशकांचा तसेच तणनाशकांचा जास्तीत जास्त वापर करतात यामुळे तननाशक व कीटकनाशके पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जाऊन ज्या ठिकाणी पाणी साठते अशा ठिकाणी मिसळतात व त्यामुळे त्या ठिकाणी उपलब्ध असलेल परिसंस्था व प्राणी यांच्यावर परिणाम होतो आणि ते नष्ट होऊ लागतात.

5) खनिजे व ज्वालाग्रही :- तेल कधी कधी समुद्रपृष्ठावर अपघात घडून येतात, त्यामुळे जल प्रदूषण होते. खनिजे व ज्वालाग्रही तेलाची वाहतूक बहुदा जहाजातून होत असते त्यातील तेलाच्या टाक्या फुटून तेल समुद्रावर पसरते त्यामुळे त्या ठिकाणी समुद्रातील जलपरीसंस्था धोक्यात येते. अर्थात त्यामुळे उपलब्ध परिसंस्था व प्राणी यांच्या व परिणाम होतो व हळूहळू त्या नष्ट होऊ लागतात.
उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना :

पृथ्वीवरील सजीव सृष्टी चांगली राहण्यासाठी आपणाला पाणी प्रदूषण, हवा प्रदूषण यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

या उपक्रमातून आपण सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी परिसंस्था या महत्त्वाच्या आहेत.

नवीन काय शिकलात :

मानवाने विज्ञानाच्या मदतीने मोठी प्रगती केली तरीही आपण निसर्गाशिवाय आपले अशस्ततव राहणार नाही हे आपण शिकलो.

निष्कर्ष

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभुत गरजा आहेत,

 यासाठी आपण आपल्या परीसरात असणाऱया जलस्त्रोत व जल परीसंस्था टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

उपक्रमाविषयी आपले मत किंवा अनुभव :

हा उपक्रम पूर्ण करत असताना आपणाला निसर्गनिर्मित परीसंस्था टीकवून ठेवणे आवश्यक असल्याचे समजते,तसेच आपण ज्या ठीकाणी राहतो त्या ठीकाणच्या परीसंस्था सुरक्षित राहतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

पालकांची मदत :

 हा उपक्रम पूणा करण्यासाठी ज्या वेळी अडचणी आल्या त्या वेळी काही माहिती पालकांकडून मीळाली तसेच त्याच्या काळातील परीसंस्था कशा होत्या हे समजण्यास मदत झाली.

सहकार्य घेतलेल्या व्यक्ती

हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी मला आमच्या शाळेतील शिक्षक्षक मित्र, आई-वडील, भाऊ-बहीण इ.यांचे सहकार्य लाभले

कारण

वाढती लोकसंख्या, औद्योशगकीकरण, रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर, कीटकनाशकांचा वापर इतयादी कारणांमुळे पाण्याचे प्रदूषण वाढत आहे. असे प्रदूषित झालेले पाणी नदीमध्ये सोडले जाते. त्यामुळे त्या ठीकाणी जलप्रदूषण होते.

परिणाम

औद्योगकीकरण, रासायनीक खतांचा अतिरिक्त वापर, कीटकनाशकांचा वापर इतयादी कारणांमुळे पाण्याचे प्रदूषण वाढत आहे, असे प्रदूषण झालेले पाणी नदीत सोडले जाते त्या ठीकाणी जलचर प्राणी असतात अशा पाण्यात विरघळणारे ऑक्सिजन चे प्रमाण कमी असते. यामुळे अजैविक व जैविक घटकांचा एकमेकांशी असलेला संबंध व त्याच्यातील आंतरक्रीया कमी होऊन परीणामी त्या जलीय परीसंस्था नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

गुणदान तक्ता     

जलसुरक्षा व्हिडीओ पहा   

No comments:

Post a Comment

Write a comment.