महर्षी धोंडो केशव कर्वे स्मृतिदिन
९ नोव्हेंबर
सामाजिक चाली-रीतींनी पिढ्यानपिढ्या बंद राहिलेली स्त्री- शिक्षणाची कवाडे उघडून स्त्रीशक्तीचे महत्व जगाला सिद्ध करून दाखविणाऱ्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड या गावी १८ एप्रिल १८५८ साली झाला. मुरुडला त्यांचे प्राथमिक शिक्षण होऊन उच्च शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. रात्रंदिवस काबाडकष्ट करून ते मॅट्रिक झाले व गणित घेऊन १८८४ साली बी.ए. झाले.