Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Saturday 10 June 2023

करिअर कसे निवडावे?

 

करिअर कसे निवडावे?




प्रस्तावना

नमस्कार मित्रांनो करिअर निवड असताना विद्यार्थ्यांना तसेच पालकांना समस्यांना तोंड द्यावे लागते दहावी बारावीला विद्यार्थ्याला चांगले गुण पडलेले असतात तरीदेखील पुढील शिक्षण घेत असताना अनेक वेळा त्याला धक्के खावे लागतात याचे नेमके कारण काय याचा शोध घेणे गरजेचे असते करीन निवडीचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण आज या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत तरी निवडताना आज ज्या क्षेत्रांमध्ये जास्त संधी आहे क्षेत्र निवडा विकी निवडू नये याचा विचार होणे गरजेचे आहे कारण आज ज्या क्षेत्रामध्ये आपणास संधी जाणवते मित्र भविष्यामध्ये त्याला चांगले दिवस राहतील का मी विचारू नये गरजेचे आहे हुशारच आपणास करिअरची निवड करणं आवश्यक आहे घोकंपट्टी करून उत्तम गुण मिळवणे फारसे अवघड नसते. त्यामुळेच परीक्षेतील गुणांवरून दिसते तीच बुद्धिमत्ता, हा गैरसमज मोडीत काढायला हवा. आधुनिक संशोधनाद्वारे ‘मल्टिपल इंटेलिजन्स’ ही संकल्पना पुढे आली आहे. करिअर निवडताना आपली बुद्धिमत्ता नेमकी कोणत्या प्रकारची आहे. याची चाचपणी करून करिअरच्या घोडदौडीत उतरायला हवे. एकविसाव्या शतकात येऊन ठाकलेले आपण, एका अर्थाने ज्ञानाच्या विस्फोटाच्या युगात जगत आहोत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील झेप तर थक्क करायला लावणारी आहे. कालचे तंत्रज्ञान आज कालबाह्य ठरत आहे. सरकारी, खासगी क्षेत्रामध्ये ई (इंटरनेट) क्रांती झाली आहे. खासगी आयुष्यातही ई संचार झाला आहे. (फेसबूक, ट्विटर, व्हॉटसअप, ई-मेल वगैरे). दहावीनंतर पुढे काय ?

ई-क्रांतीवरून हळूहळू आपण एम (मोबाइल) क्रांतीकडे वाटचाल करत आहोत. जागतिकीकरण व खुल्या अर्थव्यवस्थेमुळे तर रोजगाराचे स्वरूपच बदलत चालले आहे. चीनने एस.सी.झेड.सारख्या संकल्पना राबवून उत्पादन व्यवसायाचे चित्र बदलले. मोठ्या प्रमाणावर उत्पादन व स्वस्त उत्पादन हा जणू यशाचा मंत्र झाला. अनेक जागतिक व भारतीय कंपन्यांच्या मालाचे उत्पादन चीनमध्ये होत आहे. जेवढे काम कराल तेवढे पैसे असे नवीन वर्क कल्चर अवतरले आहे. स्वाभाविकच प्रत्येक क्षेत्रातील काम करण्याच्या पद्धतीत भरपूर बदल झाले आहेत. उदा. बँकिंग क्षेत्रात ई-क्रांतीनंतर ग्राहकांना बँकेत जायची गरजच उरली नाही. पैसे काढण्यासाठी ए.टी.एम. सेंटर्स, खात्यातील बाकी पाहण्यासाठी इंटरनेट बँकिंग वा मोबाइल बँकिंग सेवा, चेक बुक विनंतीसाठी फोन रिक्वेस्ट, खरेदी करण्यासाठी क्रेडिट वा डेबिट कार्ड या साधनांचा सर्रास उपयोग करतो. जागोजागी बँकांच्या शाखा सुरू करण्यापेक्षा ऑनलाइन सेवा अधिक सक्षम करणे हे महत्त्वाचे झाले आहे. कारकुनांपेक्षा आजकाल बँकांमध्ये सिंगल विंडो ऑपरेटर वा कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हची गरज आहे. या प्रत्येकाकडे मार्केटिंगचे कौशल्य असणे महत्त्वाचे आहे.

बदल व कामगिरीतील सातत्य

आजचा जमाना कोअर कॉम्पिटन्सचा आहे. आपले वैशिष्ट्य असलेले काम स्वत: करायचे व बाकीची कामे बाहेरून (आऊटसोर्स) करून घ्यायची हा आजचा कामाचा शिरस्ता झाला आहे. नोकरीच्या ठिकाणीसुद्धा विविध कौशल्ये असणाऱ्या व्यक्तींची आवश्यकता असते. खूप वर्षे एकाच कंपनीत काम करण्याचे आणि त्याचा अभिमान वाटण्याचे दिवस संपले आहेत. तीन ते पाच वर्षांमध्ये नोकरीची ठिकाणे बदलण्याचे प्रमाण वाढत आहे. एकाच जागी खूप वर्षे काम करत असल्यास त्या व्यक्तीमध्ये न्यून आहे, असे मानले जाते.

करियर निवडीचे मार्ग अनेक

नव्या युगात माणसांच्या गरजादेखील प्रचंड वाढल्या आहेत. कुटुंबव्यवस्थेमध्ये व सामाजिक जीवनामध्येसुद्धा भरपूर बदल झाले आहेत. कुटुंबातील माणसांची संख्या कमी होताना दिसते आहे. याचाच अर्थ रोजच्या जीवनातील अनेक गरजा भागवण्यासाठी अन्य पर्याय शोधावे लागत आहेत. (डे केअर सेंटर, पेशंट केअर सेंटर वगैरे). आधुनिक जगातील नवनव्या गरजांनी हजारो व्यवसायांना जन्म दिला आहे. यापैकी आपल्याला साजेसा कोणताही एक व्यवसाय निवडल्यास आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. महत्त्वाचा मुद्दा हा व्यवसाय वा करिअर निवडायचे कसे.

मल्टिपल इंटेलिजन्स

सर्वसाधारणपणे करिअर निवडताना दोन निकष विद्यार्थी व पालकांसमोर असतात. एक म्हणजे परीक्षेत मिळवलेले गुण व सामाजिक प्रतिष्ठा. केवळ परीक्षेतील गुणांनुसार करिअर ठरवणे तितकेसे योग्य नसते. कारण आपल्या परीक्षापद्धतीमध्ये अनेक त्रुटी आहेत. एका विशिष्ट वर्षी विशिष्ट दिवशी, विशिष्ट प्रश्न असणाऱ्या परीक्षेत विद्यार्थ्यांला मिळणारे गुण त्याच्या बुद्धिमत्तेचा खरा आरसा असतीलच, असे नाही. घोकंपट्टी करून उत्तम गुण मिळवणे फारसे अवघड नसते. त्यामुळेच परीक्षेतील गुणांवरून दिसते तीच बुद्धिमत्ता, हा गैरसमज मोडीत काढायला हवा. आधुनिक संशोधनाद्वारे ‘मल्टिपल इंटेलिजन्स’ ही संकल्पना पुढे आली आहे. गणिती बुद्धिमत्ते प्रमाणेच भाषिक बुद्धिमत्ता, कलाविषयक बुद्धिमत्ता, क्रीडाविषयक बुद्धिमत्ता असे बुद्धिमत्तेचे कितीतरी प्रकार आहेत. त्यामुळेच अभ्यासात मागे असणारा एखादा चित्रकलेत मात्र सरस असतो किंवा खेळात प्रवीण असतो. म्हणूनच करिअर निवडताना बुद्धिमत्ता नेमकी कोणत्या प्रकारची आहे, याची चाचपणी आवश्यक ठरते.

स्वत:च्या क्षमता ओळखाव्या

प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही निसर्गदत्त क्षमता असतात. कुणाचा आवाज चांगला असतो, कुणाची चित्रकला चांगली असते, शरीरयष्टी उत्कृष्ट असते इत्यादी. करिअर निवडताना या क्षमतांनुसार निवडल्यास यशस्वी होणे अवघड राहत नाही. सचिन तेंडुलकरने चांगले गाणे गावे अशी अपेक्षा आपण करत नाही किंवा शाहरुख खानला चांगले चित्र काढता यावे, अशी आपण अपेक्षा करत नाही. कारण खेळातील कौशल्य वा अभिनयातील कौशल्य हे अनुक्रमे सचिन व शाहरुखला प्राप्त झालेल्या निसर्गदत्त क्षमतांचे मूर्त रूप आहे. म्हणूनच आपणच आपल्या क्षमतांचा अंदाज घेऊन योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक ठरते.

करिअर निवडीची घाईगडबड नको

करिअर ठरविण्यात सामाजिक प्रतिष्ठा हा एक महत्त्वाचा निकष विद्यार्थी व पालकांच्या मनात असतो. त्यामुळेच अभ्यासात चांगले गुण मिळविणारा विद्यार्थी कला शाखेत जायचे म्हणतो, तेव्हा पालक त्याला परावृत्त करून विज्ञानशाखेकडे वळविण्याचा प्रयत्न करतात. किंवा आमच्या खानदानात सर्व डॉक्टर्स, इंजिनीअर असल्याने आमच्या मुलाने/मुलीनेही तेच व्हायला हवे, असे पालक बजावतात व मुलांच्याही काहीवेळा ते गळी उतरते. मात्र सामाजिक प्रतिष्ठेच्या या चुकीच्या कल्पनांमुळे विद्यार्थ्यांच्या करिअरचा बळी जाऊ शकतो. मुळात अभियांत्रिकी वा वैद्यकीय शिक्षण हेच जीवनात यशस्वी होण्याचे राजमार्ग आहेत, हा गैरसमज काढून टाकला पाहिजे. आय.आय.एम.च्या विद्यार्थ्यांला प्रतिमहा काही लाख वेतनाची ऑफर आल्याचे वाचल्यावर आपणही एम.बी.ए. करायचे हा निर्णय विद्यार्थी घेतात. पण मुळात मॅनेजमेंट क्षेत्रासाठी लागणाऱ्या क्षमता, रुची आपल्यात आहे का, याचा विचारच कोणी करत नाही. केवळ पैसा व प्रतिष्ठेच्या ‘वरलिया रूपा’ ला भुलून करिअर निवडण्याची घिसाडघाई करतात.

तुमचे व्यक्तिमत्त्व

सर्वात शेवटचा घटक म्हणजे तुमचे व्यक्तिमत्त्व कसे आहे याचाही विचार करिअर निवडताना करायला हवा. व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ बाह्य रूप (रंग, रूप व पोशाख इ.) नव्हे, तर तुमचा स्वभाव, दृष्टिकोन याही घटकांचा त्यात समावेश होतो. हवाईसेवा (एअर हॉस्टेस), जनसंपर्क, हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी नुसतेच आकर्षक व्यक्तिमत्त्व असून चालणार नाही, तर विनयशीलता, नम्रता, आपलेपणा, स्वागतशीलता या गुणांची आवश्यकता असते. संतापलेल्या ग्राहकाला शांत करण्याची हातोटी लागते.

मार्केटिंग क्षेत्रासाठी तुमचे व्यक्तिमत्त्व मैत्री करणारे, नवीन लोकांना भेटायला उत्सुक असणारे असे हवे; तर अंतर्मुख स्वभाव असणाऱ्या व्यक्ती सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग, विश्लेषणाचे क्षेत्र (कोणत्याही विषयाचे विश्लेषण - उदा. आर्थिक, गुन्हे तपास, सामाजिक), संशोधनात्मक क्षेत्र इ. ठिकाणी यशस्वी ठरतील. तुमची बुद्धिमत्ता, क्षमता व आवडीबरोबरीनेच व्यक्तिमत्त्वाचा विचार करून करिअर निवडणे महत्त्वाचे आहे. कारण ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्या क्षेत्रातील लाइफस्टाइलला (जीवनपद्धती) अनुरूप व्यक्तिमत्त्व असावे.बुद्धिमत्ता, आवड, क्षमता (ॲप्टिट्युड) व व्यक्तिमत्त्व इ. घटकांचा विचार करिअर निवडताना करायला हवा. जर या विषयी संभ्रम असेल तर अनुभवी शैक्षणिक समुपदेशकांकडून मानसशास्त्रीय कसोट्या (ॲप्टिट्युड टेस्ट) करून घ्याव्यात. या आधारे अभ्यासक्रम निवडणे व प्रशिक्षण घेणे उपयुक्त ठरते.

आवड, छंदातूनही उत्तम करिअर

करिअर निवडताना आपल्या आवडीचा म्हणजेच अभिरुचीचा विचार करणे आवश्यक असते. कारण ज्या व्यवसायात आपल्याला 35-40 वर्षे काम करायचे आहे, त्यातून आनंद मिळायला हवा. आवडीचे काम असल्यास मिळणारे समाधान, आनंद द्विगुणित होतो. मात्र अभिरुचीप्रमाणे व्यवसाय न निवडल्यास चिडचिड होणे, मानसिक व शारीरिक स्वास्थ्य बिघडणे असे परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण एका क्षेत्रातील मात्र, आपल्या आवडीनुसार असलेल्या वेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेऊन यशस्वी झालेली उदाहरणे आपल्याला दिसतात.डॉ.गिरीश ओक, डॉ.श्रीराम लागू हे वैद्यकीय डॉक्टर्स पण अभिनयाच्या क्षेत्रात त्यांनी उत्तम यश संपादन केले आहे. हर्षा भोगलेंनी इंजिनीयरिंग व मॅनेजमेंट (आय.आय.एम.मधून) करून क्रिकेट समालोचक म्हणून नाव मिळवले. म्हणजे स्वत:ची आवड, छंद यातून उत्तम करिअर करता येते.

 

No comments:

Post a Comment

Write a comment.