Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

الأربعاء، 10 أغسطس 2022

सुभाषचंद्र बोस यांचे जीवनचरित्र

    नेताजी सुभाषचंद्र बोस 

   सुभाषचंद्र बोस यांचे जीवनचरित्र  

    भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व पराक्रम करून इतिहासात अजरामर झालेल्या सुभाषचंद्र बोस यांचे जीवनचरित्र रोमहर्षक, अद्भुत व नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले आहे. सुभाषचंद्रांचा जन्म २३ जानेवारी, १८९७ रोजी कटकला झाला. जानकीनाथ व प्रभावती देवी हे त्यांचे आईवडील. त्या वेळी आपला देश पारतंत्र्यात होता. ब्रिटिश सरकारच्या अन्यायी जुलमाच्या बातम्या ऐकून सुभाषचंद्र अस्वस्थ होत असत. १९१३ साली ते मॅट्रिक परीक्षा दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९१९ साली ते बी.ए. च्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. याच काळात त्यांनी कॉलेजच्या यू. टी. सी. पथकात प्रवेश करून सैनिकी शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरविले. आय. सी. एस. होण्यासाठी ते इंग्लंडला गेले व १९२० साली ती परीक्षा चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन भारतात परत आले व ब्रिटिशांची नोकरी करू लागले. तथापि, जालियनवाला बागेसारख्या क्रूर कत्तली करणाऱ्या जुलमी इंग्रजांची नोकरी

करायची नाही, असा निश्चय करून त्यांनी आपला राजीनामा पाठविला. इंग्लंडहून परत येताच सुभाषचंद्र राष्ट्रीय चळवळीत दाखल झाले. ते म. गांधी, देशबंधू दास इत्यादी पुढाऱ्यांना भेटले. सरकारची त्यांच्या हालचालींवर करडी नजर होतीच. १९२४ साली काहीएक कारण नसताना सरकारने त्यांना अटक केली व मंडालेला हद्दपार केले. तीन वर्षांनी तेथून सुटका झाल्यावर त्यांनी भारतात तरुणांच्या संघटना उभारल्या. १९३८ साली हरिपुर येथे व१९३९ साठी त्रिपुरा येथे भरलेल्या काँग्रेस अधिवेशनांचे सुभाषचंद्र अध्यक्ष होते. त्या वेळी त्यांची भाषणे म्हणजे पेटत्या मशाली होत्या. त्यानंतर सुभाषचंद्रांनी काँग्रेसचा राजीनामा दिला व 'फॉरवर्ड ब्लॉक' नावाचा पक्ष काढला.

    भारतावर स्वारी

    २२ जून, १९४० रोजी सुभाषचंद्र मुंबईला स्वा. सावरकारांना भेटले. सावरकरांनी त्यांना परदेशी पलायन करून इटली, जर्मनी यांनी पकडलेल्या भारतीय सैनिकांची मदत घेऊन भारतावर स्वारी करून स्वातंत्र्य मिळविण्याचा सल्ला दिला. या वेळी ब्रिटन दुसऱ्या युद्धात बुडले होते. त्याच्यापुढे जीवनमरणाचा प्रश्न होता. सुभाषचंद्रांनी या संधीचा फायदा घेण्याचे ठरविले; कारण 'पीडकांचे जे संकट तीच पीडितांची संधी' सुभाषचंद्रांना पटले. भारतात चळवळ करून काही फायदा होणार नाही; बाहेरूनच दणका घ्यावयास  हवा.

    छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा 

    अशा बिकट प्रसंगी सरकार सुभाषचंद्रांना परदेशात जाऊ देणेच शक्य नव्हते. सुभाषचंद्रांना कलकत्त्यात नजरकैदेत ठेवले होते. इतिहासाची पुनरावृत्ती होते असे तसे अगदी खरे आहे. आग्र्याला औरंगजेबाच्या नजरकैदेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या हिकमतीने पहारेकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करून कल्कपतापूर्वक सुटका करून घेतली. अगदी त्याच पद्धतीने सुभाषचंद्र नजरकैदेतून कले. सुभाषचंद्रांनी आजारपणाचे सोंग घेतले, दाढी वाढविली, मौलवीचा वेष धारण केला . मौलवी म्हणजे अगदी हुबेहूब मौलवी बनले. 'झियाउद्दीन पठाण' असे नाव केले. रात्री आठच्या सुमारास पहारा थोडा गाफील आहे असे पाहून ते खोलीतून पडले. पुढच्या प्रवासासाठी बाहेर कार्यकर्ते सिद्ध होतेच. सुभाषचंद्र तेथून वरला गेले. तेथून काबूलमार्गे जर्मनीत बर्लिनला पोहोचले. त्या वेळी ब्रिटिशांच्या सैन्तीयाल  कित्येक भारतीय सैनिक युद्धकैदी बनून हिटलर मुसोलिनींच्या छावण्यात अडकले होते. सुभाषचंद्र त्यांना भेटले. थोड्याच दिवसांत जपानही महायुद्धात उतरला. सुभाषचंद्रांना मदत करण्याचे जपानने मान्य केले. 

     तुम्ही मला रक्त द्या.मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो '

२८ मार्च, १९४१ रोजी सुभाषचंद्रांनी रेडिओवरून भारतीय लोकांना स्वातंत्र्यलढ्याचे आवाहन केले. त्यांनी 'आझाद सेना' तयार केली. सुभाषचंद्र भारतीय नागरिकांना म्हणाले. 'तुम्ही मला रक्त द्या.मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो '  या घोषणेने भारतीय मने पेटून उठली. ८ ऑगस्ट, १९४३ सुभाषचंद्र 'आझाद हिंद सेनेचे' सरसेनापती झाले. सैनिकांनी त्यांचा 'नेताजी' 'उद्घोष केला. सुभाषचंद्रांनी 'चलो दिल्ली', 'जय हिंद' अशी घोषणा केली. पण । १८ ऑगस्ट, १९४५ रोजी विमानाने प्रवास करताना विमान पेटले व त्यात त्यांचे निधन झाले.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Write a comment.