Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

الاثنين، 17 أكتوبر 2022

मनाची एकाग्रता

 

मनाची एकाग्रता

अशी वाढवा मनाची एकाग्रता 

एकदा एका शिष्याने आपल्या गुरुला विचारले, " गुरुदेव, मला साधनेचे खरे रहस्य कशात असते ते सांगा. " गुरुदेव त्याला घेऊन एका गावात गेले. एक शेतकरी शेतात नांगरणी करत होता. त्याचे इतर कशातही लक्ष नव्हते. तेथून पुढे ते एका घरासमोर आले. तेथे। एक छोटा मुलगा एकटाच खेळत होता. तेवढ्यात तिकडून एक साप सळसळत


त्याच्या जवळून गेला, तरी त्याचे कशातच लक्ष नव्हते. तेथून पुढे ते एका घराच्या अंगणात आले. तेथे त्या घरातील स्त्री स्वयंपाक करण्यात एवढी गुंग झाली होती की गुरुदेवांचा आवाज तिला ऐकू आला नाही.

तिथून पुढे ते एका हलवायाच्या दुकानासमोर आले. तो पेढे वळण्यात एवढा मग्न होता की तिथून गेलेल्या वरातीकडे त्याने मान वर करून पाहिले नाही. हीच गोष्ट लोहार, धार काढणारी गवळीण यांच्या बाबतीतही झाली. फिरुन फिरुन दमल्यावर दोघेही विश्रांतीसाठी एका झाडाखाली बसले. गुरुदेव म्हणाले, " हे सर्व पाहून तुला काय समजलं ? " शिष्याने मान हलवून अज्ञान प्रकट केले. गुरुदेव म्हणाले, " वत्सा, धान्य पिकवण्यासाठी घाम गाळणारा शेतकरी त्यात पूर्ण रममाण होतो. लोहार त्याच्या कष्टाशी एकरूप होतो म्हणूनच कठीण लोखंडाला योग्य आकार देणे त्याना जमते. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मनाची एकाग्रता लागते. एकाग्रतेमुळे ध्येय सिद्धी होते हे लक्षात ठेव. चंचलतेमुळे अनर्थ होतो. काम बिघडते. म्हणूनच जीवनात प्रत्येक कामात एकाग्रता महत्त्वाची आहे. "

तात्पर्य  : कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मनाची एकाग्रता लागते.

बोधकथा संग्रह  

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Write a comment.