महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. संत म्हणजे सत्पुरुष आहेत . संतांच्या साहित्याचा आत्मा भक्तीबरोबरच समाजप्रबोधन, समाजकल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काहीही मागत नाहीत.या पवित्र भूमीतील महाराष्ट्रात सर्व संतांना प्रिय असलेले पवित्र निर्मळ तिर्थक्षेत्र म्हणजे पंढरी. पंढरी म्हणजे संतांचे माहेर घर. परंतु अनेक तीर्थक्षेत्रांपैकी संतांनी पंढरीलाच आपले माहेर घर का म्हणाले?
सकळ देवांचे माहेर । सकळ संतांचे निजमंदिर। ते हे पंढरपूर जाणावे ।।
