स्वमत उत्तरात स्वतःचे अनुभव आणि मत प्रभावीपणे मांडण्यासाठी खालील महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात:
- उताऱ्याच्या आशयाशी सांगड घाला: स्वमत म्हणजे केवळ मनाने काहीही लिहिणे नव्हे, तर दिलेल्या उताऱ्याला आणि त्यातील विषयाला अनुसरून आपला दृष्टिकोन मांडणे होय. तुमचे अनुभव पाठातील किंवा उताऱ्यातील मध्यवर्ती कल्पनेशी जोडलेले असावेत.
- प्रमाण भाषेचा वापर करा: तुम्हाला आलेले अनुभव आणि मनातल्या भावना नक्की सांगाव्यात, पण ते लिहिताना तुमच्या प्रादेशिक बोलीभाषेचा (उदा. कोकणी, वऱ्हाडी) वापर न करता सोपी, स्पष्ट आणि 'पुस्तकी' (प्रमाण) भाषा वापरावी. तसेच, व्याकरणाच्या व शुद्धलेखनाच्या चुका टाळाव्यात.
- स्वतःचे मत स्पष्टपणे मांडा: उताऱ्यातील माहिती जशीच्या तशी कॉपी न करता, तुमच्या स्वतःच्या शब्दांत आणि सोप्या भाषेत तुमचे मत मांडा. उताऱ्यातील एखाद्या विचाराशी किंवा पात्राच्या कृतीशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात, हे ठामपणे आणि स्पष्टपणे सांगा.
- सकारात्मक दृष्टिकोन ठेवा: स्वतःचे अनुभव लिहिताना शक्यतो नकारात्मक (Negative) विचार मांडणे टाळावे. जर लेखकाचा दृष्टिकोन सकारात्मक असेल, तर आपले मतही त्याच अनुषंगाने सकारात्मक असावे, ते नकारात्मक दिशेने नेऊ नये.
- मर्यादित आणि मुद्देसूद लेखन: तुमचे अनुभव खूप लांबवत न बसता किंवा पल्हाळ न लावता, प्रश्नाचे उत्तर ६ ते ७ ओळींमध्ये मोजक्या आणि प्रभावी शब्दांत पूर्ण करावे
बोर्डाच्या परीक्षेला बरेच विद्यार्थी उताऱ्यातील स्वमत हा प्रश्न सोडवतच नाही का तर त्यांना माहीतच नसतं की स्वमत कसं लिहायचं मित्रांनो स्वमत हा प्रश्न तुम्हाला तीन मार्कांसाठी विचारला गेलेला असतो पैकी तीन मार्क या प्रश्नांमध्ये कसे मिळतील त्यासाठी कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे आणि लिखाण कसं करायला पाहिजे जेणेकरून तीन पैकी तीन मार्क्स तुम्हाला त्या प्रश्नामध्ये मिळतीलच स्वमत कसे लिहायचे तर स्वमत म्हणजे यातच अर्थ आहे की स्वतः मत आपल्याला त्याच्यात मांडायचं असतं तर हा प्रश्न तुम्हाला
समास म्हणजे काय शोधताय मग विचार कसला करताय क्लिक
उताऱ्यामध्ये प्रश्नांमध्ये विचारला गेलेला असतो तीन मार्कांसाठी तर मित्रांनो हा प्रश्न तीन मार्कांसाठी विचारला गेलेला असतो त्यामुळे त्यासाठी सहा ते सात ओळी एवढं उत्तर तुमचं अपेक्षित असतं तर प्रश्न कशा पद्धतीने विचारला गेलेला असतो जो काही आपल्याला उतारा दिलेला असतो त्यावरूनच आपल्याला एक विषय दिलेला असतो आणि त्या विषयावर आपल्याला आपले मत हे मांडायला सांगितलेले असते तर मित्रांनो यासाठी तुम्हाला काय काळजी घ्यायला पाहिजे कुठले मुद्दे लक्षात घ्यायला पाहिजेत तर उतारा तुम्ही दोन वेळेस काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुम्हाला उतारा उतारा समजेल की उतारा कशावर आहे कन्सेप्ट काय आहे हे तुम्हाला क्लिअर होईल स्वमत लिखाणासाठी तुम्हाला तिथून काय पॉईंट्स भेटू शकतात त्या पॉईंट्स वरून तुम्हाला लेखन करणं हे सोपं जाईल तर सहा ते सात ओडी या ओळींमध्ये तुमचं उत्तर असायला हवं आणि मित्रांनो काळजी घ्या की काना वेलांटी अशी छोट्या छोट्या चुका करू नका जेणेकरून तुमचे मार्क्स त्यात कट होणार नाहीत आणि स्वच्छ आणि नीट नेटके अक्षर काढा भाषा ही एकदम सोपी वापरा अशा पद्धतीने तुम्हाला स्वमत लेखन हे करायचं असतं तर मित्रांनो याचं एक एक्झाम्पल सुद्धा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे जे की मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलं गेलेलं तर मित्रांनो स्वमत कसे लिहावे तीन मार्कांसाठी सर्वात पहिले तुम्ही परीक्षेत बघून घ्या घ्या पॉज करून तुम्ही परिच्छेद काळजीपूर्वक वाचा मग तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने आपल्याला उत्तर लिहायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने प्रश्न असतो स्वमत ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम तुमच्या शब्दात लिहा हा प्रश्न मागच्या वर्षीच विचारला गेलेला होता तीन मार्कांसाठी बरेच स्टुडंट हा प्रश्न सोडवून देतात तर हा प्रश्न खूप सोपा असतो तुम्ही हा अटेम्प्ट नक्की करू शकतात मी ऑलरेडी तुम्हाला काही महत्त्वाचे पॉईंट्स सांगितले आहे त्यावरूनच आपल्याला स्वमत लेखन करायचं आहे तर प्रश्नांमध्ये आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग चे दुष्परिणाम लिहायला सांगितले आहे तर कशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे तर उत्तर बघा अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकतात मानवाने केलेल्या प्रदूषणामुळे ओझोनचा थर पातळ झाला आहे त्यामुळे सूर्यकिरण थेटपणे पृथ्वीवरती मारा करत असल्याने पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे या तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील हिमनग वितळू लागले आहेत त्यामुळे समुद्राची पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढू लागली आहे त्याचबरोबर त्वचा रोगाचे प्रमाण वाढत आहे उष्माघातामुळे अनेकांचे बळी जात आहेत आजारांचे प्रमाणही वाढीस लागले आहे बघा मित्रांनो तीन मार्कांचा प्रश्न आहे म्हणून सहा ते सात ओळींमध्ये तुम्हाला उत्तर लिहायचंय येत आहे म्हणून भरभरून पेपर भरलेला दिसायला हवा म्हणून काहीतरीच लिहत बसू नका ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या नमूद करा अशा पद्धतीने तुम्हाला स्वमत लेखन करायचं आहे अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व करू शकतो आणि त्यात पैकीच्या पैकी मार्क्स हे आपण मिळवू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ त्या गरजू विद्यार्थ्यांना नक्की पोहोचवा जे यावर्षी बोर्डाची एक्झाम देत आहेत किंवा देणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद

No comments:
Post a Comment
Write a comment.