Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भाषण

 

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  भाषण


 

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।।

            

                     आज ५ सप्टेंबर शिक्षक दिन. या दिनानिमित्त सर्व गुरुजनांना वंदन. आजचा दिवस संपूर्ण भारतात थोर धर्म व तत्त्वज्ञानाचे उपासक एक शिक्षक माजी राष्ट्रपती यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा के जातो. या महान तत्त्ववेत्याचे विचार एक व्यक्ती आणि एक शिक्षक सर्वासी चिंतनीय आहेत. शिक्षकाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात, सुसज्ज इमारती आणि साधने आली तरी आदर्श शिक्षकांची जागा ती घेऊ शकणार नाहीत.'

           शिक्षक म्हणजे नेमके काय ? तर शि-शिलवान, क्ष-क्षमाशील, क-कला ज्यांच्याकडे शिल, क्षमा, आणि कला, कर्तृत्व याचा त्रिवेणी संगम आहे? म्हणजे शिक्षक, खरं तर शिक्षक हा लाखो करोडो मन घडविणारा शिल्पकार  आहे. कुंभार जसा फिरत्या चाकावर मातीला आकार देऊन मडके बनवत राजदूत म्हणून भारत तेच काम शिक्षकाचे आहे.

            ज्यांनी संपूर्ण जगाला तत्वज्ञानाचे धडे दिले अशा थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ.  सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी जाणून घेवूया. यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी आंध्र प्रदेशातील तिरुताणी येथे एका गरीब परिवारात झाला. त्यांचे बालपण तिरुताणी व तिरुपती या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तेथीलच एका मिशनरी शाळेतून झाले. १९०५ साली मद्रास येथील मिशनरी कॉलेजातून तत्वज्ञान हा विषय घेवून ते बी. ए. झाले. १९०८ साली एम. ए. झाले. त्या पदवीसाठी त्यांनी वेदांतिक नीतिशास्त्र या विषयांवर  प्रबंध लिहिला होता. वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला आणि उपजीविकेसाठी त्यांनी सन १९०९ मध्ये मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम सुरु केले. तत्वज्ञानासारखा कठीण विषय ते अगदी सहज सोपा शिकवीत असत. त्यामुळे ते विद्यार्थ्यांचे लाडके शिक्षक बनले. हिंदुधर्मास श्रेष्ठत्व देण्यासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले. ते लेख वाचून पाश्चात्य, विद्वान राधाकृष्णन यांना 'आधुनिक ऋषी' म्हणून त्यांचा गौरव करु लागले. या महान विचारवंताने शिक्षकी पेशा पत्करुन आयुष्यभर उद्बोधनाचे पवित्र कार्य केले.

      आयुष्यभर कुठल्या ना कुठल्यातरी नावाजलेल्या विश्वविद्यालयाशी ते संबंधित राहिले. कलकत्ता विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत असताना म्हणजे १९२६ मध्ये इंग्लंडला भरलेल्या "आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषदेसाठी त्यांची भारताचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली. पुढे अनेक देशांत त्यांनी हिंदूंचे धर्मतत्वज्ञान प्रभावीपणे मांडले. नंतर ते जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी म्हणून मान्यता पावले.

          ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयात सुद्धा शिकायची त्यांची फार इच्छा होती. पण परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. पण पुढे त्यांची ख्याती पाहून ऑक्सफोर्ड विद्यापीठाने त्यांना आमंत्रण देवून धर्म, नीतिशास्त्र आणि तत्त्वज्ञान या विषयांवरील व्याख्यानासाठी बोलाविले. त्यांनी अनेक ग्रंथ ही लिहिले. शिक्षण आणि पवित्र धर्म यांना त्यांनी आपल्या लेखनात प्राधान्य दिले. हिंदू संस्कृतीचा महिना व त्याचे महत्व सांगणारा 'इंडियन फिलॉसॉफी' हा ग्रंथ त्यांनी लिहिला. भगवद्गतीतेचे त्यांनी इंग्रजीतून भाषांतर केले.

        राधाकृष्णन हे  एक कुशल प्रशासक होते. त्यांनी राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधित्व केले. १९५२ मध्ये युनेस्कोचे अध्यक्षपद भूषविले. १९४९ साली रशियाचे पहिले राजदूत म्हणून भारत सरकारने त्यांची नियुक्ती केली. पुढे १९५२ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले. १९६७ मध्ये त्यांना भारताचे दुसरे राष्ट्रपती होण्याचा मान मिळाला. १९५४ साली भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देऊन गौरविण्यात आले.

          राधाकृष्णन एक महान विचारवंत, लोकप्रिय शिक्षक, विद्वान शिक्षणशास्त्रज्ञ, कुशल, कुटनीतितज्ञ आणि प्रशासक होते. त्यांनी आजन्म शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षण विषयांत लक्ष घालून दिलेले विचारधन लक्षात घेऊनच त्यांचा जन्मदिन हा 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. डॉ. राधाकृष्णन हे हाडांचे शिक्षक होते. शिक्षण क्षेत्रातील अनास्था दूर करण्यासाठी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यापासून आपण प्रेरणा घेऊया ! भारताच्या या महान विचारवंत व शिक्षकाचे  निधन १७ एप्रिल १९७५ ला झाले.

        मित्रांनो आपण 'शिक्षक दिन' साजरा करतो ते आदर्श शिक्षकाचा सन्मान भावना व्यक्त करावा याच उद्देशाने आपल्या शालेय जीवनातील एक महत्त्वाचा दिन आहे. आपल्या गुरुजनांच्या संबंधातली आदराची आणि कृतज्ञतेची करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो. या थोर विचारवंत व आदर्श शिक्षकाबद्दल शेवटी मी एवढंच म्हणेन !

                 काळ ही थांबून मागे वळून पाहिल जरा..

तो ही लावून करेल तुमच्या कार्याला मुजरा"

तुमच्या कार्याला मुजरा !

धन्यवाद !

No comments:

Post a Comment

Write a comment.