Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

उंटाचा अतिशहाणपणा -मराठी गोष्ट

 

             उंटाचा अतिशहाणपणा मराठी गोष्ट

             Camel Wisdom Marathi Story

                  एका गावातील एक सुतार वडिलार्जित कामात पूर्ण आडणी होता.त्याला  सुतारकाम येत नसल्याने उपजीविकेसाठी त्याच्यात व पत्नीत वारंवार तंटे निर्माण होत.एक दिवस त्याने रागारागाने एक  उंटिण खरेदी केली. नंतर त्या उंटिणीला एक पोर झालं. कौतुकाने सुताराने त्या पोराच्या गळ्यात घंटा बांधली. काही दिवसांनी उंटाचा व्यापार करण्यासाठी सुताराने आणखी उंट खरेदी केला. त्या व्यापारात सुताराचे बस्तान चांगले बसते. गळ्यात घंटा बांधलेला उंट सुताराचा लाडका असतो.

पण हा उंट बाहेर चरताना कळपाबरोबर न राहता, रमत गमत एकटा फिरायचा. तेव्हा बाकीच्या उंटांना वाटे की हा जंगलात असा एकटा फिरतो तर एखाद्या दिवशी वाघ-सिंह त्याला पकडतील. त्यांनी त्याला कळपात राहण्याचा सल्ला दिला ,पण त्या उंटाने त्याकडे दुर्लक्ष केले.

एके दिवशी सर्व उंट चरून घरी परतले तरी हा उंट जंगलातच रेंगाळत होता. त्याला स्वत:बद्दल गर्व होता ,त्यामुळे तो इतरांची दखल घेत नसत ,त्याचवेळी एका सिंहाने त्याच्यावर पाळत ठेवली. त्याच्या गळ्यातील घंटेमुळे हा उंट लक्षात येई. त्या दिवशी काळोखात उंट वाट चुकला. पण सिंहाने घंटेच्या आवाजावरून अंदाज घेऊन त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला खाऊन टाकले.

तात्‍पर्य: शहाणपणाच्या उपदेशाकडे दुर्लक्ष केले तर जीवावर संकट येऊ शकते.

marathi katha reading onely tach 

 

1 comment:

Write a comment.