Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

रानटी व गावठी हंस

 

 

रानटी व गावठी हंस


Ranati va Gavathi Hans  ,Storyin Marathi

     एका शेतकऱ्याने आपल्या शेतात एका कुंपणात काही हंस पाळले होते. सर्व हंस खाऊन पिऊन मजेत होते ,एक दिवस त्यापैकी दोन हंस एकमेकात बातचीत करू लागले .पहिला दुसऱ्यास म्हणाला अरे आपण असे किती दिवस या कुंपणात राह्चे ,आपण इथून कुठेतरी दूर जाऊण राहूया. दुसरा म्हणाला मलाही तसेच वाटते पण इथून जायचे कसे हा मोठा प्रश्न आहे.यावर पहिला म्हणाला त्याची काळजी करू नकोस माझ्या मागून ये आणि ते दोघे कुंपणाच्या फटीतून बाहेर पडले व जवळच एक ओढा होता त्यातून पोहत पोहत एका दलदलीच्या जागी जाऊन पोहोचले. तेथे त्यांना चांगले खाद्य मिळू लागले म्हणून त्यांनी तेथे कायम राहावयाचे ठरविले.

लहान पणा पासून कुंपणात राहायची सवय लागल्यामुळे त्यांना फक्त मिळेल ते खाणे एवढेच माहित होते .त्यांच्या संरक्षणाची पूर्ण काळजी मालक घेत असल्यामुळे ते पूर्णता निर्धास्त होते .येथे त्यांना मुक्त वातावरणात  खूप आनंद होत होता .त्या आनंदात ते पुढे येणाऱ्या संकटास पण विसरून गेले होते . जवळच्या रानटी हंसाचा एक कळप वरचेवर तेथे येऊन बसत असे.

त्या कळपातील हंसांनी या गावठी हंसांशी मैत्री करण्याचे ठरवले पण  पाहिल्याद्या त्यांना  संकोच वाटला. पण कालांतराने त्यांचा इतका परिचय झाला की, ते त्यांच्याशी अगदी मोकळेपणाने वागू लागले.

एके दिवशी त्या हंसाचे आवाज ऐकून एक कोल्हा लपत छपत तेथे आला व तो त्यांच्यावर झडप घालणार तोच त्याची चाहूल ऐकून सगळे रानटी हंस ओरडत आकाशात उडून गेले.

ते दोघे गावठी हंस मात्र तेथेच राहिले. गावात असताना त्यांचा मालक त्यांचे रक्षण करीत असे. त्यामुळे त्यांना उडण्याची किंवा स्वतःचे रक्षण करण्याची सवय नव्हती. त्यामुळे ते दोघेही त्या कोल्ह्याच्या भक्ष्यस्थानी पडले.

तात्पर्य: जेथे आपले रक्षण करण्यास आपण समर्थ नाही तेथे जाउन राहणे मूर्खपणा होय.

marathi story       onely teach 

No comments:

Post a Comment

Write a comment.