मोठ्या दिलाचा राजा--राजर्षी शाहू
इतिहास तू वळूनी पाहसी पाठीमागे जरा
झुकवून मस्तक करशील, तयांना
मानाचा मुजरा
उपस्थित गुरुजन, सूज्ञ परीक्षक माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज आपणासमोर विषय मांडत आहे. दलितांचा कैवारी, अनाथांचा नाथ. मोठ्या दिलाचा राजा'शाहू महाराज' कोल्हापूरचे संस्थानिक ख्यातनाम समाजसुधारक, दलितोद्धारक के सार्वजनिक कार्यकर्ते श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी पुणे-बेंगलोर महामार्गावरील एक छोटंसे गाव म्हणजे कागल. गाव जरी लहान होत तरी त्याला इतिहास होता. कागल एक संस्थान होते आणि संस्थानचे संस्थानिक जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाडगे हे मनाने मोठे दिलदार बाणेदार होते. त्यांना शोभणाऱ्या त्यांच्या पत्नी राधाबाई या पुण्यशिल जोडीच्या पोटी खरे तर आधुनिक भारताच्या भाग्यविधात्याचा आरक्षणाच्या जणकाचा आणि मोफत प्राथमिक शिक्षणाचा पाया घालण्याऱ्या खऱ्या खुऱ्या महर्षीचा जन्म झाला म्हणावयास हरकत नाही.