राष्ट्रपिता महात्मा गांधी
सेवापथक सुरु
भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले त्या राष्ट्रपिता गांधींचा (मोहनदास करमचंद गांधी) जन्म काठेवाडात पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. त्यांचे वडील राजकोट संस्थानचे दिवाण होते. म. गांधींचा विवाह त्यांच्या चौदाव्या वर्षी कस्तुरबांशी झाला. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. बॅरिस्टर होऊन परत आल्यावर ते दक्षिण आफ्रिकेतील जुलमी गोऱ्या राज्यकर्त्या विरुद्ध लढा देण्यासाठी आफ्रिकेत गेले. तेथे त्यांना वर्णभेदाचा अतिशय वाईट अनुभव आला . तेथे गोरे इंग्रज हिंदी लोकांवर अतोनात जुलूम करीत असत. त्यांना गुलामासारखे वागवत . आगगाडीत कोणत्या वर्गात काळ्या लोकांनी बसायचे हे गोरे इंग्रज ठरवीत. म.गांधीनी स्वत: त्याचा अनुभव घेतला. हिंदी लोकांवर होणारा जुलूम नाहीसा करण्यासाठी म.गांधींनी अहिंसेच्या व सत्याग्रहाच्या मार्गांनी चळवळ केली. दक्षिण आफ्रिकेत युद्ध चालू असताना जखमी लोकांवर औषधोपचार करण्यासाठी त्यांनी सेवापथक काढले.