Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Thursday 29 July 2021

मराठी म्हणी अर्थासह स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त

 

मराठी म्हणी

शैक्षणिक व्हिडिओ पाहणेसाठी  -  Click here

(1) अति तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा परिणामी नुकसान कारकच ठरतो.

(2) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा  - जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो, त्याचे काम मुळीच होत नाही.

(3) अडला हरी गाढवाचे पाय धरी -  एखादया बुद्धिमान, सज्जन माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख, दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते.

(4) असतील शिते तर जमतील भूते - एखादया माणसाकडून फायदा होणार असला की, त्याच्या भोवती माणसे गोळा होतात.

(5) आगीतून निघून फुफाट्यात पडणे - लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे.

(6) आधी पोटोबा, मग विठोबा- प्रथम पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म, परमार्थ करावा.

 (7) आपलेच दात, आपलेच ओठ- आपल्याच माणसाने चूक केल्यामुळे अडचणीची स्थिती निर्माण होणे.

(8) आयत्या बिळावर नागोबा - एखादयाने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा दुसऱ्याने आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.

व्हिडीओ पाहणेसाठी     click here

(9) आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे.

(10) आंधळं दळतं, कुत्रं पीठ खातं - एकाने काम करावे आणि दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.

(11) इकडे आड तिकडे विहीर - दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे.

(12) उचलली जीभ लावली टाळ्याला - विचार न करता बोलणे,

13) उथळ पाण्याला खळखळाट फार - अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो.

14) ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये- कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.

15) एक ना धड, भाराभर विध्या - कोणतेही एक काम पूर्ण न करता, अनेक कामे एकामागून एक करायला घेणे.

16) काखेत कळसा, गावाला वळसा - जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे.

17) कामापुरता मामा - गरजेपुरते गोड बोलणारा मतलबी माणूस

18) खाण तशी माती-  आईवडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे.

वाक्प्रचार व्हिडीओ पाहणेसाठी  - click here

(19) गाढवाला गुळाची चव काय? - ज्याला एखादया गोष्टीचा गंध नाही; त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.

(20) गरज सरो, वैदय मरो- एखाच्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपली की, त्याला ओळखही न दाखवणे.

(21) गर्जेल तो पडेल काय? -  केवळ बाता  करणाऱ्या माणसाकडून काहीही घडत नाही.

 (22) गोगलगाय अन् पोटात पाय - बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपण करणारी व्यक्ती.

(23) घरोघरी मातीच्या चुली -एखादया बाबतीत सामान्यतः सर्वत्र सारखीय परिस्थिती असणे

(24) चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे - प्रत्येकाला केव्हा तरी परिस्थिती अनुकूल होतेच.

(25) चोर सोडून संन्याशाला फाशी -  खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.

(26) चोराच्या मनात चांदणे - वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय, अशी सारखी भीती वाटत असते

(27) चोरावर मोर - एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्यावर मात करणे

(28) झाकली मूठ सव्वा लाखाची - गुप्त ठेवण्याजोगी बाब गुप्तच ठेवावी; व्यंग नेहमी झाकून ठेवावे.

(29) ताकापुरती आजीबाई - आपले काम होईपर्यंत एखाद्याशी गोड बोलणे.

 (30) तळे राखील, तो पाणी चाखील - ज्याच्याकडे एखादे काम सोपवलेले असेल; त्यातून तो स्वत:चा काही तरी फायदा उठवणारच.

 (31) थेंबे थेंबे तळे साचे - दिसण्यात क्षुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा हळूहळू संग्रह केला असता, कालांतराने वस्तूंचा मोठा संचय होतो.

(32) दगडावरची रेघ – खात्रीची गोष्ट असणे.

 (33) दगडापेक्षा वीट मऊ - मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे.

 (34) दिव्याखाली अंधार - मोठ्या माणसाच्या ठिकाणीदेखील काही दोष असतातच

(35) दुरून डोंगर साजरे - कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ गेल्यानंतर तिचे खरे स्वरूप कळते.

(36) नाचता येईना अंगण वाकडे - आपल्याला एखादे काम करता येत नसेल, तेव्हा आपला कमीपणा झाकण्याकरिता संबंधित गोष्टीत दोष दाखवणे

(37) नाव मोठं, लक्षण खोट - बाहेरचा भपका मोठा असणे; पण कृतीच्या नावाने मात्र शून्य असणे.

(38) नाकापेक्षा मोती जड – मालकापेक्षा नोकराची मिजास अधिक. 

(39) पळसाला पाने तीनच - सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे

(40) पाचामुखी परमेश्वर - पुष्कळ लोक बोलतात ते खरे मानावे

(41) पालथ्या घड्यावर पाणी - केलेला उपदेश निष्फळ ठरणे

(42) पी हळद नि हो गोरी – कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे.

(43) पुढच्यास ठेच मागचा शहाणा - दुसऱ्याचा अनुभव पाहून त्यावरून काही बोध घेणे व सावधपणे वागणे.

(44) बळी तो कान पिळी - बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवतो (45) बुडत्याचा पाय खोलात माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूनी होऊ लागते.

(46) बुडत्याला काडीचा आधार - घोर संकटाच्या प्रसंगी मिळालेली थोडीशी मदतदेखील महत्त्वाची वाटते.

(47) मुलाचे पाय पाळण्यात दिसतात - लहान वयातच व्यक्तीच्या मोठेपणाच्या गुण-दोषांचे दर्शन होते.

(48) यथा राजा तथा प्रजा - प्रमुख माणसाच्या आचारविचाराप्रमाणेच त्याच्या अखत्यारीतील इतर माणसांचे आचारविचार असतात.

(49) लहान तोंडी मोठा घास - आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन     करणे.

(50) वरातीमागून घोडे- एखादी गोष्ट होऊन गेल्यावर मागाहून तत्संबंधीची साधने जुळवणे व्यर्थ असते.

(51) वासरांत लंगडी गाय शहाणी - मूर्ख माणसांत थोडेसे ज्ञान असणाराही शहाणा ठरतो.

(52) हत्ती गेला, शेपूट राहिले - कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि अल्पसाच व्हायचा राहिला.

(53) हातच्या काकणाला आरसा कशाला? – स्पष्ट असलेल्या गोष्टीला पुरावा नको.

शैक्षणिक व्हिडिओ पाहणेसाठी  -  https://bit.ly/3eRhoEw

 

             Sanjay S. Magdum

                                                              Adarsh Education   8788629133

No comments:

Post a Comment

Write a comment.