Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Tuesday 27 July 2021

अकरावी (CET)सीईटीची तयारी करताय ?मग घाबरू नका . या ट्रिकचा उपयोग निश्चित तुमच्या फायद्याचा ठरू शकतो.

 

अकरावी (CET)सीईटीची तयारी करताय ?मग घाबरू नका . या ट्रिकचा 

उपयोग निश्चित तुमच्या फायद्याचा ठरू शकतो.  


दहावी परीक्षेचा ताण संपला आणि उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्या अगोदरच अकरावी प्रवेश परीक्षा CET जाहीर झाली .त्यामुळे आवडत्या कोर्स किंवा कॉलेजला प्रवेश घेणे अवघड जाऊ शकते . पण विद्यार्थी मित्रानो घाबरू नका .आपणास सीईटीचा सामना करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स ( ट्रिक ) दिल्या आहेत त्याचा उपयोग करा.निश्चित या परीक्षेत उपयोग होईल .



दहावी परीक्षेचा ताण संपला आणि उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्या अगोदरच अकरावी प्रवेश परीक्षा CET जाहीर झाली .त्यामुळे आवडत्या कोर्स किंवा कॉलेजला प्रवेश घेणे अवघड जाऊ शकते . पण विद्यार्थी मित्रानो घाबरू नका .आपणास सीईटीचा सामना करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स ( ट्रिक ) दिल्या आहेत त्याचा उपयोग करा.निश्चित या परीक्षेत उपयोग होईल .

थोडे हेंही महत्वाचे  

·       अकरावी प्रवेशांसाठी यंदा ऐच्छिक सीईटी ( CET )

·       समजून घ्या कशी करावी तयारी सीईटी ची तयारी

·       गोंधळून न जाता थोडा संयम ठेवा .

·       स्वत:वर विश्वास ठेवा ,तुम्हाला आवडत्या कोर्सलाच प्रवेश घ्या.

या वर्षी सोनलला दहावीत ९९.००% तर अपूर्वला दहावीत ९७.५% टक्के मार्क मिळून उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करायचा सोडून, पुढच्या परीक्षेची तयारी सुरू करावी लागत आहे. म्हणून ते थोडे  हिरमुसलेले आहेत. अशी परिस्थिती अनेकांची या वर्षी झाली आहे. बोर्डाची परीक्षा नसल्याचा आनंद होताच. पण आता अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात सामान्य प्रवेश परीक्षा (सीईटी) द्यावी लागणार, ह्या विचाराने ते नाराज झाले आहेत. मनासारखे मार्क मिळूनदेखील प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे याचा ताण आणि त्रास अनेक विद्यार्थ्यांना होत आहे. आणि परीक्षा म्हटले की तयारी ही लागणारच. जे वेगळ्या बोर्डातले आहेत, त्यांना एसएससी बोर्डचा अभ्यासदेखील करावा लागणार आहे, हा त्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

दहावीचा ताण पूर्णपणे संपलेला, उत्तीर्ण झाल्याचा आनंद, आवडत्या कोर्ससाठी प्रवेश, कॉलेजला जाण्याचा उत्साह ह्या तीक्षेची तयारी करणं अवघड जाऊ शकते. सीईटी (cet)चा सामना करण्यासाठी आपल्यास मदत करण्यासाठी येथे काही टिप्स ( ट्रिक) देत आहे.

 * परीक्षेची पद्धत किंवा मार्किंग सिस्टिमबद्दल कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. योग्य अधिकाऱ्यांकडून योग्य माहिती घ्या.

* अभ्यासाचे फक्त चार विषय आहेत . _ गणित ,विज्ञान, समाजशास्त्र,  इंग्रजी हे जाणून घ्या आणि अभ्यास  करा ,यशस्वी व्हा .

* विषय नुसार क्वेशन बँकचा वापर करा;त्यात दिलेल्या MCQ सोडवा .

* स्वतःचे विश्लेषण करा. स्वत:चे सामर्थ्य आणि सोपे / वेळ घेणारे विषय समजून घ्या.

* आदर्श वेळापत्रक तयार करा आणि त्याचा वापर करा.

* जरी आधी विषय वाचले आणि समजले असतील तरी  उजळणी करा.

* नवीन संकल्पना अस्पष्ट असल्यास, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा.

* जरी आपल्याला ती पुनरावृत्ती वाटत असेल तरी, परीक्षेसाठी लक्ष केंद्रित करण्याचा आणि अभ्यास करण्याचा प्रयत्न करा.

* तुम्ही ऑनलाइन उपलब्ध अभ्यासाच्या साहित्याचा संदर्भ घेऊ शकता.

* परीक्षेचा पॅटर्न नीट समजून घ्या.

* स्वतःच्या तयारीबद्दल अतिआत्मविश्वास बाळगू नका.

* चांगले मार्क मिळाले म्हणून सीईटीच्या तयारीकडे दुर्लक्ष करू नका

* अभ्यासासाठी विशिष्ट तास वेळ द्या. छोटे ब्रेक घ्या आणि नंतर आपली तयारी पुन्हा सुरू करा.

*   अभ्यासात काही अडथळे आल्यास  आपल्या शिक्षकांचे  मार्गदर्शन घ्या.

* परीक्षेचा  ताण  घेऊ नका  . 

निकालाच्या आनंदात वाहवत जाऊ नका, मनावर थोडा संयम ठेवून परीक्षेची तयारी करा. तुमच्याकडे अद्याप वेळ असल्याने परीक्षेची चांगल्या प्रकारे तयारी होऊ शकते, हे लक्षात असू दे. प्रथमच सीईटी आयोजित केले जात आहे. म्हणून चिंताग्रस्त आणि गोंधळलेले असणे साहजिक आहे. परंतु यामुळे आपल्या तयारीवर परिणाम होऊ देऊ नका. जरी तुम्ही एक विशिष्ट कोर्स / करिअर घ्यायचे ठरवले असले तरीही, प्रवेशासाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे, हे विसरू नका. जरी तुम्हाला अभ्यासाची पुनरावृत्ती करण्यास कंटाळा आला असला, तरीही विसरू नका की या परीक्षेतील कामगिरी तुम्हाला तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याची शक्यता वाढविण्यास मदत करेल.

 आपणास परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा

 

3 comments:

Write a comment.