Home

  • Home
  • दहावी
  • नववी
  • आठवी
  • शिष्यवृत्ती
  • पुस्तके
  • व्याकरण
  • शासन निर्णय
  • दहावी भूगोल
  • शै.व्हिडिओ निर्मिती
  • pdf Download
  • Online Test
  • सामान्यज्ञान
  • मराठी बोधकथा
  • सण समारंभ
  • शालेय भाषण
  • गेम स्वरुपात उपक्रम
  • Adarsh Education

     Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

    Thursday, 16 September 2021

    आलंकारिक शब्द

     

    आलंकारिक शब्द

     अष्टपैलू - सर्व गुणसंपन्न

    अकरावा रुद्र - अतिशय तापट माणूस

    अकलेचा कांदा - मूर्ख

    अकलेचा खंदक - अत्यंत मूर्ख माणूस

    अरण्यरुदन  - ज्याचा उपयोग नाही असे कृत्य

    अळवावरचे पाणी - फार काळ न टिकणारे

    अक्षरशत्रू - निरक्षर, अडाणी

    ओनामा - सुरुवात, प्रारंभ

    उंटावरचा शहाणा - मूर्खपणाचा सल्ला देणारा

    उंबराचे फूल  - दुर्मिळ वस्तू

    कर्णाचा अवतार - उदार मनुष्य

    कळसूत्री बाहुले  - दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा

    कळीचा नारद -  कळ लावणारा

    काडी पहिलवान -  हडकुळा

    कुंभकर्ण - अतिशय झोपाळू

    कूपमंडूक  - संकुचित वृत्तीचा

    कोल्हेकुई - क्षुद्र लोकांची बडबड

    खडाजंगी - मोठे भांडण

    खुशालचेंडू - चैनीखोर माणूस

    खेटराची पूजा - अपशब्दाने खरडपट्टी काढणे

     गर्भश्रीमंत - जन्मापासून श्रीमंत

    गंगायमुना -  अश्रू

    गंडांतर - भीतीदायक संकट

    गाजरपारखी - कसलीही पारख नसलेला, मूर्ख

    गुरुकिल्ली - मर्म, रहस्य

     गुळाचा गणपती - मंद बुद्धीचा

    गोगलगाय - गरीब, निरुपद्रवी मनुष्य

    घरकोंबडा -  घराबाहेर न पडणारा

    चर्पटपंजरी - निरर्थक बडबड

    चौदावे रत्न  -  मार

    छत्तीसचा आकडा - शत्रुत्व

    जमदग्रीचा अवतार - रागीट मनुष्य

    टोळभैरव - कामात नासाडी करणारे लोक

    ताटाखालचे मांजर - दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा

    त्रिशंकू - धड ना इकडे, धड ना तिकडे

    दगडावरची रेघ - कधीही न बदलणारे

     देवमाणूस - चांगला सज्जन माणूस

    धोपट मार्ग - सरळ नेहमीचा मार्ग

    नवकोट नारायण - खूप श्रीमंत

    नंदीबैल - 'हो' ला 'हो' म्हणणारा

    पर्वणी -  अतिशय दुर्मिळ योग

    पाताळयंत्री -  कारस्थान करणारा

    पांढरा कावळा – निसर्गात नसलेली वस्तू

     पांढरा परीस  - लबाड

    पिकले पान -  म्हातारा

    शैक्षणिक व्हिडीओ पहा -

    पोपटपंची -  अर्थ न कळता पाठांतर करणारा

    बृहस्पती  - बुद्धिमान

    बिनभाड्याचे घर  -  तुरुंग

    बोके संन्यासी  - ढोंगी मनुष्य

    बोलाचीच कढी - केवळ शाब्दिक वचने

    भगीरथ प्रयत्न  - आटोकाट प्रयत्न

    भाकडकथा  - बाष्कळ गोष्टी

    भीष्म प्रतिज्ञा  - कठीण प्रतिज्ञा

    मंथरा – दुष्ट स्त्री

    मायेचा पूत - मायाळू, पराक्रमी मनुष्य

     मारुतीचे शेपूट - लांबत जाणारे काम

    मृगजळ - केवळ आभास

    मेषपात्र  - बावळट

    रामबाण औषध - अचूक गुणकारी

    लंकेची पार्वती - अत्यंत गरीब स्त्री

    लंबकर्ण - बेअकली

    वाटाण्याच्या अक्षता -  नकार

    वामनमूर्ती - ठेंगू , बुटका माणूस

    वाहती गंगा- आलेली संधी

    शकुनीमामा - कपटी मनुष्य

     व्हिडिओ पाहणेसाठी क्लिक - click here 

    No comments:

    Post a Comment

    Write a comment.कमेंट करा

    ad