Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Wednesday 8 September 2021

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस ८ सप्टेंबर

 आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस ८ सप्टेंबर  


            जागतिक साक्षरता दिन  

              साक्षरतेचे महत्त्व कोणाला माहीत नाही? पण केवळ शिक्षण देणे म्हणजे साक्षरता नव्हे, तर मानवी प्रगतीच्या वाट्यात अडथळा बनण्याचा, गरिबीला नष्ट करण्याचा तो एक वैशिष्ट्यपूर्ण आणि शक्तीशाली मार्ग आहे. जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि समाज बदलवण्यासाठी साक्षरता हे एक परिणामकारक साधन आहे.

                राष्ट्रकुलाच्या 'युनेस्को' (शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक) या संघटनेने १९६५ साली जागतिक पातळीवर साक्षरता दिन साजरा करण्याची घोषणा केली व त्याच्या पुढच्या वर्षापासून ८ सप्टेंबरला जगभर ती प्रथा रुढ झाली. शिक्षणाचे महत्त्व सकलजनांना पटवून देण्यासाठी या दिवशी विविध प्रकारचे कार्यक्रम हाती घेतले जातात. गरिबीचे उच्चाटन, बालमृत्यू, लोकसंख्या वाढ, स्त्रीपुरुष समानता, शांती आणि प्रजासत्ताक धोरण या समाज उन्नतीशी निगडीत बाबींच्या मुळाशी शिक्षण आहे व त्याचा प्रसार झाला तर अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात.

          युनेस्कोच्या व्याख्येनुसार साक्षरता म्हणजे माणसाला दैनिक जीवनाशी निगडित बाबीविषयी लिहिता वाचता येणे, मानवी जीवनातील घडामोडींचे विश्लेषण करता येणे व वैयक्तिक स्वातंत्र्य अबाधित ठेवून स्वत:च्या व समाजाच्या प्रगतीस हातभार लावणे.

जागतिक साक्षरता दिन 

हा प्रतिवर्षी सप्टेंबर या तारखेला साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय सहकार्यातून शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक विकास त्यातून शांतता सुव्यवस्थेला उत्तेजन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणार्या युनेस्कोने शिक्षणाचेसाक्षरतेचे  महत्त्व लक्षात घेऊन ८ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक साक्षरता दिन' म्हणून साजरा करण्याचे ठरविले. युनेस्कोत हा निर्णय ७ नोव्हेंबर .. १९६५ रोजी झाला आणि ८ सप्टेंबर .. १९६६ पासून जगभरात 'जागतिक साक्षरता दिन' साजरा केला जाऊ लागला.No comments:

Post a Comment

Write a comment.