Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Friday 22 September 2023

जागतिक हृदय दिवस (World Heart Day)

 

जागतिक हृदय दिवस (World Heart Day)


 


हृदयविकारासंबंधित जनजागृती करण्याचा दिवस म्हणून २९ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जगभरामध्ये साजरा करतात. या दिवसाला जागतिक हृदय दिवस असे संबोधतात. या उपक्रमामध्ये हृदयविकाराचे प्रतिबंधात्मक उपाय आणि या विकाराचा जागतिक पातळीवर होणारा परिणाम यांचा समावेश होतो.

जागतिक हृदय संघटना (World heart Federation, WHF) आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिवसाला मान्यता मिळाली (१९९९). जागतिक हृदय संघटनेचे अध्यक्ष (१९९७-९९) आंतोनियो लुना (Antonio Bayes de Luna) यांच्या संकल्पनेतून हा वार्षिक उपक्रम राबवण्यात आला.

उपक्रमाच्या सुरुवातीला सप्टेंबर महिन्यातील अखेरचा रविवार हा जागतिक हृदय दिवस म्हणून ठरवण्यात आला. त्यानुसार २४ सप्टेंबर २००० रोजी जागतिक हृदय दिवस प्रथमच साजरा केला गेला. सन २०११ पासून २९ सप्टेंबर हा जागतिक हृदय दिवस म्हणून घोषित करण्यात आला.

शिष्यवृत्ती परीक्षा सराव पेपर

जागतिक आकडेवारीनुसार हृदयविकार हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. अधिकतर व्यक्ती हृद् रोहिणी विकार किंवा हृदयविकाराचा झटका आल्याने मरण पावतात. असंतुलित आहार, व्यायामाची कमतरता, धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलता, हवाप्रदूषण ही हृदयविकाराची महत्त्वाची कारणे आहेत.

हृदयविकारासंबंधित माहिती तसेच प्रतिबंधात्मक उपाय यांबद्दल चर्चा, फलक किंवा माहिती पत्रिका यांद्वारे २९ सप्टेंबर या दिवशी जनजागृती केली जाते. आंतरराष्ट्रीय हृद् रोहिणी संशोधन संस्था आणि वैद्यकीय समूहांद्वारे शास्त्रीय बैठक आणि चर्चा आयोजित केल्या जातात. तसेच जागतिक हृदय ‍दिवसानिमित्त शैक्षणिक कार्यक्रम आणि आरोग्य शिबिरे घेतली जातात. संतुलित आहार, व्यायाम यांद्वारे हृदयविकाराला प्रतिबंध होऊ शकतो, याबाबत माहिती दिली जाते.

मराठी म्हणी अर्थासह

प्रत्येक वर्षी जागतिक हृदय संघटनेद्वारे कार्यक्रमाची रूपरेखा (Theme) उद्धृत केली जाते. प्रथम वर्षी  शारीरिक सक्रियता (Physical activity) या रूपरेषेला अनुसरून जनसामान्यांमध्ये माहितीचा प्रसार करण्यात आला. २००३ मध्ये ‘स्त्री आणि हृदयविकार’ ही रूपरेषा ठरवण्यात आली. याद्वारे स्त्रियांमध्ये उद्भवणाऱ्या हृदयविकाराची कारणमीमांसा आणि उपचार यांबाबत माहिती देण्यात आली. २००८ मध्ये ‘हृदयविकाराची शक्यता’ याचे मोजमापन करण्याबाबत (Know your risk)  रूपरेषा आखण्यात आली. याद्वारे व्यक्तिसापेक्ष हृदयविकार होण्याच्या संभावनांचे मूल्यमापन करण्यात आले. २०१९ मध्ये स्वत:च्या आणि इतरांच्या हृदयाची काळजी घेण्याबाबत (My Heart, Your Heart) रूपरेषा योजण्यात आली. अशा पद्धतीने संतुलित वजन, निरोगी हृदयासाठी आवश्यक जीवनशैली तसेच व्यवसायाच्या ठिकाणी हृदय निरोगी राखण्यासाठी पूरक वातावरण निर्मिती अशा अनेक महत्त्वपूर्ण रूपारेखांना वाहिलेले कार्यक्रम देखील जागतिक हृदय दिवस या दिवसाच्या निमित्ताने आखण्यात येतात. 

सदर पोस्ट प्रचार आणि आरोग्य विषयक प्रसार यासाठीच

 सौजन्य विकिपीडिया

No comments:

Post a Comment

Write a comment.