Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Monday 25 September 2023

जलासुरक्षा उपक्रम 9 वी /10 वी

 


                                                                जलशिक्षण - उपक्रम   जलचक्र

 

उपक्रमाचे नाव : जलचक्राच्या प्रतिकृतीतून जलचक्र समजून घेणे.

उपक्रमाचा उद्देश  :

जलचक्र म्हणजे काय समजून घेणे .

पृथ्वीवरील जल व त्याची रूपे कोणती ते समजून घेणे .

महत्त्व पृथ्वीवर पाणी हे बर्फ, बाफ, द्रव अशा सर्व रूपात असते. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे वाफेमध्ये रुपांतर होण्याचे कार्य अखंडपणे चालू असते. याच
वाफेचे पुढे पावसामध्ये रूपांतर होण्याची जलचक्राची प्रक्रिया प्रतिकृतीतून समजावून घेणे.

उपक्रमासाठी नियोजित कालावधी  : २ ते ७  दिवस

 

साहित्य व उपकरणे :

पांढरा कार्डशीट पेपर, आवश्यक तैलरंग, पेन्सिल, पट्टी.

उपक्रमाची कार्यपद्धती : १) जलचक्राची प्रक्रिया समजून घेण्यासाठी जलचक्राच्या आकृतीची निवड केली. २) सर्वप्रथम पांढरा कार्डशीट कागद घेतला. त्यावर जलचक्राची आकृती काढण्यास सुरुवात केली. ३) प्रथम समुद्राच्या पाण्याचे होणारे बाष्पीभवन आकृतीत दाखवले. ही पाण्याची वाफ आकाशात वर वर जाताना दाखवली. ४) ही वाफ वर गेल्यावर त्याचे एकत्रित जे ढंग तयार होतात ते  दर्शविले. ५) वातावरणात उंच गेलेले ढग वाऱ्याबरोबर वाहत असताना पर्वतामुळे अडवले जातात व त्या भागात पाऊस पडल्याचे दाखवले.

 ६) जमिनीवर पडणारे पाणी वाहत त्याचे ओहळ, झरे, नदी यात रूपांतर होते ते चित्रस्वरूपात दाखवले.

७) काही प्रमाणात पाणी जमिनीत झिरपते. त्यामुळे भूजल पातळी दाखवली.

८) नदी पुढे वाहत जाऊन समुद्राला मिळते ते दाखवले.

९) अशा चक्राकार प्रवासाला समजण्यासाठी आकृतीमध्ये दिशा दाखवल्या.

१०) अशा प्रकारे प्रतिकृतीतून जलचक्र समजून घ्यायचा प्रयत्न केला.

 जलसुरक्षा जलचक्र उपक्रम

https://youtu.be/H53OwwObZNE

उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना :

सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते. त्या वाफेचे वर गेल्यावर दग होता हे ढंग वाऱ्याबरोबर वाहत जाऊन पर्वतरांगांनी अडवले जातात व त्यातील पाणी पावसाच्या रुपात खाली येते. तेच पाणी नदी, नात्यांतून समुद्रास मिळते हे अविनाशी जलचक्र आहे.

नवीन काय शिकलात?

 जलचक्र म्हणजे समुद्राचे पाणी शुद्ध करून त्याचे भूजलावर पुनर्भरण करणे. हे जलचक्र पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी अनिवार्य आहे.

निष्कर्ष :

 पृथ्वीवर अस्तित्वात असलेले पाणी हे सतत एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरीत होते. म्हणजेच पाण्याची वाफ व पुन्हा पाणी असे हे अविनाशी चक्र अखंडपणे वातावरणात चालू असते.

उपक्रमाविषयी आपले मत / अनुभव लिहा. : जलचक्राची प्रतिकृती तयार करताना जलचक्राची प्रक्रिया व तिचे उपयोग लक्षात आले. पाण्याच्या पुनर्वापरालाच जलचक्र म्हणतात.

पालकांची मदत : जलचक्राची सखोल माहिती मिळण्यासाठी पालकांच्या मदतीने इंटरनेटवरुन माहिती गोळा केली. प्रतिकृती तयार करताना पालकांची मदत झाली.

 

पालकांचे मत : पालकांच्या मते जलचक्राची माहिती ही मुलांना असणे गरजेचे आहे. त्यामुळे मुलांना पाण्याचे वहन वेगवेगळ्या स्त्रोतातून कशा प्रकारे होते हे समजते. पाणी हे नवीन तयार होत नसून ते एका रूपातून दुसऱ्या रूपात जात असते हे समजते. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करावा मुलांना समजते.

सहकार्य घेतलेल्या व्यक्ती : पालक, शिक्षक, वर्गमित्र,बहिण ,भाऊ ...

 

वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी  :

१) जलसुरक्षा पुस्तक २) इंटरनेट ३) विकिपीडिया .......

 शिक्षकांचा अभिप्राय 

स्वाक्षरी व दिनांकासह

 आवश्यक  साहित्य  अभ्यासा 👇👇👇👇👇


जलसुरक्षा उपक्रम / प्रकल्प  इयत्ता 9वी / १०वी  pdf

 

जलसुरक्षा उपक्रम / प्रकल्प गुणदान तक्ता pdf  येथे मिळेल 

 

जलसुरक्षा गुणदान व श्रेणीकशी द्यावी   येथे पहा 


पर्यावरण व परिसंस्था जलशिक्षण  १०वी  


जलचक्र जलसुरक्षा 9वी


जलसुरक्षा पाऊस व पावसाचेप्रकार
No comments:

Post a Comment

Write a comment.