Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Thursday 12 August 2021

शब्दसमूहाबद्दल एक शब्द | मराठी व्याकरण

शब्दसमूहाबद्दल एक शब्द |

मराठी व्याकरण 

 One word substitution In Marathi

           Sanjay Magdum 



pdf  डाऊनलोड करणेसाठी शेवटी जा व click here येथे क्लिक करा. 

१) ज्याचा थांग लागत नाही असे – अथांग

२) देव आहे असे मानणारा – आस्तिक

३)भले होवोअशी मंगल कामना – आशीर्वाद

४) दक्षिण सामुद्राजवळच्या सेतूपासून हिमालयापर्यत – आसेतुहिमाचल

५) अग्नीची पूजा करणारा – अग्नीपूजक

६) मोजता येणार नाही इतके – असंख्य ,अमाप

७) जयचा कधीच विसर पडत नाही असा – अविस्मरणीय

८) अन्नदान करणारा – अन्नदाता

९) खूप दानधर्म करणारा – दानशूर

१०) जिवाला जीव देणारा- जिवलग

११) जाणून घेण्याची इच्छा असणारा – जिज्ञासू

१२) दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा – कनवाळू

१३) कामाची टाळाटाळ करणारा – कामचुकार

१४) धर्मस्थान करणारा – धर्मसंस्थापक

१५) देशासाठी झटणारा – देशभक्त ,देशभक्ती

१६) कोणत्याच पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा – निष्पक्षपाती

१७) हट्टीपणा करणारा – दुराग्रही

१८) ईश्वराचे अस्तित्व न मानणारा – नास्तिक

१९) दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी

२०) जुन्या मातांना चिकटून राहणारा – पुराणमतवादी ,सनातनी

२१) नवीन मते स्वीकारणारा – पुरोगामी

२२) दुसऱ्यावर अवलंबून असणारा – परावलंबी

२३) थोडक्यात समाधान मानणारा – अल्पसंतुस्ट

२४) अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष ठेवणारा – अष्टावधानी

२५) एखाद्या संस्थेची स्थापना करणारा – संस्थापक

२६) सेवा करणारा – सेवक

२७) सत्यासाठी झगडणारा – सत्याग्रही

२८) एकाच काळातील – समकालीन

२९) शभंर वर्षे आयुष्य जगणारा – शतायुषी

३०) स्वतःचे काम स्वतःच करणारा – स्वावलंबी

३१) स्वतःच्या इच्छेप्रमाणे खैरपणे वागणारा – स्वच्छदी

३२) श्रम करून जीवन जगणारा – श्रमिक

३३) दुसऱ्याचे भाषण ऐकणारा – श्रोता

३४) श्रद्धा देऊन वागणारा – श्रद्धाळू

३५) वाट दाखविणारा – वाटाड्या

३६) देशासाठी प्राण अर्पण करणारा – हुतात्मा

३७) स्वतःच्या हिताचा त्याग करणारा – स्वार्थत्यागी

३८) क्षमा करणारी वृत्ती असणारा – क्षमाशील

३९) सभेत धीटपणे भाषण करणारा- सभाधीट

४०) शत्रूकडील बातमी काढून आणणारा – हेर

४१) हातात चक्र असलेला – चक्रपाणी

४२) विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा – ध्येयनिष्ठ

४३) दैवावर हवाला ठेवून वागणारा – दैववादी

४४) जगाचा स्वामी – जगन्नाथ

४५) श्रम न करता खाणारा – ऐतखाऊ

४६) केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा – कृतज्ञ

४७) केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवणारा- कृतघ्न

४८) कलेची आवड असणारा – कलाप्रेमी

४९) दुसऱ्याच्या मनातले जाणणारा – मनकवडा

५०) दगडावर कोरीव काम करून मूर्ती बनविणारा – मूर्तिकार

५१) उदयाला येत असणारा – उद्योमुख

५२) अस्वलाचा खेळ खेळणारा – दरवेशी

५३) चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चौक ,चव्हाटा

५४) तीन रस्ते एकत्र येतात ती जागा – तिठा

५५) गावच्या न्यायनिवड्याची जागा – चावडी

५६) आकाशात गमन करणारा – खग

५७) पाण्यात राहणारे प्राणी – जलचर

५८) न टाळता येणारे – अटळ

५९) कधीही मरण नसणारे – अमर

६०) ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही आसे – अतुलनीय

६१) आवरता येणार  नाही असे – अनावर

६२) वर्णन करता येणार नाही असे – अवर्णनीय

६३) कधीही ज्याचं नाश नाही होत ते – अविनाशी

६४) किल्याच्या भोवती बांधलेली भिंत – तट

६५) मनात इच्छिलेले देणारा मणी – चिंतामणी

६६) इच्छिलेली वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष – कल्पवृक्ष

६७) कोणत्याही क्षेत्रात एकाएकी घडून येणार मोठा बदल – क्रांती

६८) हळूहळू घडून येणारा बदल – उत्क्राती

६९) धान्य साठविण्याची जागा – कोठार

७०) दोनदा जन्मलेला – व्दिज

७१) कार्य करणारी जागा – कर्मभूमी

७२) कसलाही लोभ नसलेला – निर्लोभी

७३) वाटसरूंना राहुटीसाठी धर्मार्थ बांधलेली इमारत – धर्मशाळा

७४) तीन महिन्यांनी प्रसिध्द होणारे – त्रैमासिक

७५) पंधरा दिवसांनी प्रसिध्द होणारे – पाक्षिक

७६) राजाची स्तुती करणारा – भाट

७७)  जणांचा कारभार – बारभाई

७८) मृत्यूवर विजय मिळवणारा – मृत्युजंय

७९) मोजकेच बोलणारा – मितभाषी

८०) मोजकेच आहार घेणारा – मिताहारी

८१) ज्याला खूप माहित आहे आसा – बहुश्रुत

८२) आईवडील  नसलेला – पोरका

८३) न्यायाच्या बाबतीत कठोर असणारा – न्यायनिष्ठुर

८४) पुरामुळे नुकसान झालेले लोक – पूरग्रस्त

८५) पाणी मिळवण्याची केलेली फुकट सोय – पाणपोई

८६) मुद्याला धरून असलेले – मुद्देसूद

८७) शेजाऱ्यांशी वागण्याचर कर्तव्य – शेजारधर्म

८८) बोधपर वचन – सुभाषित

८९) लोकांना आवडणारा – लोकप्रिय

९०) संकटाचे निवारण करणारा – विघ्न्ह्रर्ता

९१) वर्षाने प्रसिध्द होणारे – वार्षिक

९२) स्वतःशी केलेले भाषण – स्वागत

९३) राजाचे बसवायचे आसन – सिहासन

९४) आपल्याच देशात तयार  झालेली – स्वदेशी

९५) मोजक्या शब्दात सांगितलेले तत्त्व – सूत्र

९६) हृदयाला जाऊन भिडणारे – हृदयंगम

९७) क्षणात नष्ट होणारे – क्षणभंगुर

९८) दोन नद्या एकत्र मिळवण्याचे ठिकाण – संगम

९९) दगडावर कोरलेले लेख – शिलालेख

१००) जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण – क्षितिज

 


शब्दकोडी पहा फक्त येथे - click here  



No comments:

Post a Comment

Write a comment.