Adarsh Education

- SM-->

Adarsh Education

 Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

Tuesday 31 August 2021

सप्टेंबर महिन्यात होणार 'TET' परीक्षा,शिक्षकांना खुशखबर

 शिक्षकांना खुशखबर , सप्टेंबर महिन्यात होणार 'TET' परीक्षा 



मुंबई: राज्यातील विविध शाळांमध्ये (School) रिक्त असलेल्या शिक्षकांच्या (Teacher) जागा भरण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून (Education System) 15 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीत शिक्षक पात्रता परीक्षा (महा-टीईटी) (TET Exam) घेतली जाणार असून ही परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाकडून आज मान्यता देण्यात आली आहे. इयत्ता पहिली ते पाचवी गट आणि दुसरा इयत्ता सहावी ते आठवी गट अशा दोन गटांसाठी ही परीक्षा असणार आहे. ( Teachers TET Exam will be on September Month-nss91)तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर शिक्षण विभागाकडून ही टीईटी घेतली जाणार आहे. यासाठी नोंदणी‍ प्रक्रिया आणि त्याचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. राज्यातील सरकारी, अनुदानित, आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमध्ये सरकारकडून 6 हजाराहून अधिक शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी मान्यता देण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी आयोजित केली जाणार आहे. यामुळे राज्यातील शाळांना मोठ्या प्रमाणात टीईटी ही परीक्षा देण्याची संधी शिक्षकांना उपलब्ध होणार आहे

मागील काही वर्षांत टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना अजूनही नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना सेवेत घेता आलेले नाही. असख्ंय उमेदवार त्यासाठीची वाट पाहत आहेत. आज राज्यातील शाळांमध्ये असंख्या जागा रिक्त्त असल्याने त्या ठिकाणी त्यांची नियक्ती करणे आवश्यक आहे. मात्र कोरोनाच्या नावाखाली रिक्त जागा न भरणे योग्य नाही. आता ही परीक्षा होत असून त्याचे स्वागत असले तरी जे उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांचा अगोदर विचार व्हावा.- नागो गाणार, शिक्षक आमदारमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून 2019 मध्ये टीईटी घेण्यात आली होती, त्या परीक्षेचा निकाल हा ऑगस्ट 2020 मध्ये जाहीर करण्यात आला होता. त्या परीक्षेला बसलेल्या पेपर एक आणि पेपर दोन अशा दोन्ही पेपरच्या 2 लाख 43 हजार 284 उमेदवारांपैकी केवळ 16 हजार 592 इतकेच उमेदवार यशस्वी ठरले होते., त्यातील अनेक उमेदवारांना आत्तापर्यंत नियुक्ती मिळाली नाही, शिक्षक म्हणून स्वप्न पाहणारे हे उमेवार वाट पाहत आहेत, यामुळे त्यांचा प्रामुख्याने विचार व्हावा-सुधीर घागस, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटनाअशी झाली होती मागील वर्षांतील टीईटी पात्र उमेदवारवर्ष- पेपर 1- पेपर -2 एकूण2014 2563 7032 95952015 1903 7086 89892017 7445 2928 103732018 4030 5647 96772019 10487 6105 16592(2016 आणि 2020 या वर्षांत टीईटी परीक्षा झाली नाही)


No comments:

Post a Comment

Write a comment.