Home

  • Home
  • दहावी
  • नववी
  • आठवी
  • शिष्यवृत्ती
  • पुस्तके
  • व्याकरण
  • शासन निर्णय
  • दहावी भूगोल
  • शै.व्हिडिओ निर्मिती
  • pdf Download
  • Online Test
  • सामान्यज्ञान
  • मराठी बोधकथा
  • सण समारंभ
  • शालेय भाषण
  • गेम स्वरुपात उपक्रम
  • Adarsh Education

     Sanjay Magdum, Adarsh Vidyalaya Ambawade, Tal- Panhala SUBSCRIBE TO MY YOUTUBE CHANNEL

    Saturday, 28 August 2021

    शब्दांच्या जाती व प्रकार parts of speech

     

    शब्दांच्या जाती ( parts of speech)

    शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार होय.प्रत्येक शब्दांचे वाक्यात  कार्ये विविध प्रकारची असतात .अशा शब्दांच्या वाक्यातील कार्या वरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत.वाक्यात येणाऱ्या शब्दांचे असे आठ प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे.त्यांनाच शब्दांच्या आठ जाती असे म्हणतात.


                                                        शब्दांचे प्रकार


     विकारी(सव्यय) शब्द                  २    .अविकारी(अव्यय) शब्द 








    विकारी शब्द :            नाम, सर्वनाम, विशेषण व क्रियापद या चार प्रकारच्या शब्दांच्या जातीत. लिंग, वचन व विभक्ती यांच्यामुळे बदल होतात म्हणून व्याकरणात त्यांना ‘विकारी शब्द’(सव्यय) असे म्हणतात.

    उदा.: सभ्य स्त्री-पुरुषहो, माझ्या वादन विद्यालयाचा हा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. आपल्या चरणी ही कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे.

           या परिच्छेदात ‘स्त्री’, ‘पुरुष’, ‘विद्यालय’, ‘कार्यक्रम’, ‘चरणी’, ‘आनंद’, यासारखी ‘नामे’ आली आहेत. ‘माझ्या’, ‘हा’, ‘मला’, ‘आपल्या’, यासारखी‘सर्वनामे’, आली आहेत. ‘सभ्य’, ‘जाहीर’, इ. ‘विशेषणे’ आली आहेत आणि ‘आहे’ हे ‘क्रियापद’ आहे.

    अविकारी शब्द :            क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय या चार प्रकारच्या शाब्दांच्या जातीत लिंग, वचन व विभक्ती यांच्यामुळे बदल होत नाही, म्हणून त्यांना ‘अविकारी शब्द (अव्यय)’ असे म्हणतात.

    उदा. १) आजी गटागटा औषध पिते आणि साखर खाते.

         २) अरेरे! आजीला झाले तरी काय? 

         ३) आजीपासून आनंद घ्यायचा व तो इतरांना वाटून टाकायचा.

        या वाक्यांत ‘गटागटा’- क्रियाविशेषण, ‘आणि’,‘व’ ही उभयान्वयी अव्यये, तर ‘पासून’ हे शब्दप्रयोगी अव्यय आणि ‘अरेरे!’ हे केवलप्रयोगी अव्यय आलेले आहे.





                                                                                                                                                

     

     


    No comments:

    Post a Comment

    Write a comment.कमेंट करा

    ad